mazi-janmthep-marathi-book-reiew

माझी जन्मठेप

पोस्ट शेयर करा:

लेखक – विनायक दामोदर सावरकर

समीक्षण – सिद्धांत तरटे

प्रकाशक – परचुरे प्रकाशन मंदिर

पृष्ठसंख्या – ३६८

मूल्यांकन – ४.८ | ५

अखंड तेजाचा धगधगता अग्निकुंड, अचाट बुद्धीमत्ता, अफाट सामर्थ्याचे प्रतिक आणि मातृभूमी बद्दल असलेले प्रचंड प्रेम म्हणजेच विनायक दामोदर सावरकर.

वि. दा. सावरकर लिखित माझी जन्मठेप यामध्ये सावरकरांना झालेल्या अमानवी शिक्षेचे, अनुभवांचे तसेच इंग्रजांच्या क्रूर मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे वर्णन केले आहे. या पुस्तकाबद्दल मला माझ्या शालेय जीवनापासून आकर्षण होते. काही राजकीय पक्ष्यातील लोकांनी सावरकरांविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयन्त केला होता. अर्थात, अशाने महान व्यक्तिचे महत्व कमी होत नाही. अर्थातच पुलनी म्हटल्याप्रमाणे, सावरकरांचे विचार पचवणे अवघड आहे, त्याला सारासार विवेकबुद्धी आणि आकलन शक्ती हवी. हे पुस्तक Lockdown च्या काळामध्ये माझ्या आईच्या वाचनसंग्रहात मिळालं. माझ्या सारख्या सामान्य वाचकाकडून या पुस्तकाबद्दल लिहताना शब्द व भावना अपुऱ्या पडत आहेत.

वयाच्या २६ व्या वर्षी नाशिकच्या कलेक्टरच्या हत्येच्या कटामधे सहभाग असल्याच्या आरोपावरून ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा, तेही दूर अंदमानात. तिथेही एकत्र येऊन तुरुंगात होणाऱ्या अत्याचाराचा सामना त्यांनी केला. अतोनात शारीरिक परिश्रम व मानसिक खच्चीकरण होत असताना कैद्यांमध्ये शिक्षणाची, वाचनाची आणि देशप्रेमाची आवड निर्माण केली. सावरकरांनी अंदमानमध्ये भोगलेल्या कष्टाचे हृदयद्रावक वर्णन वाचणाऱ्याच्या हृदयाचा थरकाप उडविल्याशिवाय राहत नाही.

राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान आणि धगधगते लेखन करणारे क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांनी १०,००० पेक्षा जास्त मराठी पाने व १५०० पाने इंग्रजी मध्ये लिहून ठेवली तसेच ६००० ओळींचं विख्यात काव्य निर्माण केलं. आताच्या आणि पुढील कित्येक पिढ्यांचा विश्वास बसणार नाही असे अंदमानातील सावरकरांचे जीवन, मातृभूमी बद्दलचे निस्वार्थी, निस्सिम प्रेम, त्यांची काव्य प्रतिभा,संघर्ष हे सारं प्रेरणादायी आहे. उद्देशाने झपाटलेले जगणं अनुभवायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

समीक्षण – सिद्धांत तरटे

mazi janmthep vinayak damodar savarkar parchure sidhant tarate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/841/mazi-janmthep—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

3 Comments

  • धन्यवाद सिध्दांत।
    अगदी थोड्या शब्दात उत्तम समीक्षण केलंय। नक्की घेतो हे पुस्तक वाचायला।

  • धर्माचा इतिहास हा अगदी महाभारता पासून ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासापर्यंत चालत आलेला आहे. पाकिस्तान हा जसा मुस्लिम धर्मीयांचा देश आहे, तसा हिंदू धर्मीयांचा देश कोणता? तर नेपाळ हे आपल्या पैकी खूप लोकांना माहीत नसेल . आपल्या मधे हिंदू धर्माबद्दल विशेष प्रेम जागृत करणारे दुसरे कोणी नसुन फक्त एक क्रांतिकारक आहेत ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर…. काळया पाण्याची शिक्षा ह्या बदल अपना सगळ्यांना माहीत आहेच पण मुंबईचे डोंगरी कारागृह ते अंदमानातील जन्मठेपेची शेवटची रात्र पर्यंतचा सगळं प्रवास वर्णाला आहे. राजबंदीवान हे नेमके कोण … त्यांना दिला जाणारा त्रास हा नरकाहून कसा भयंकर होता हे वाचताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पत्नीची भेट होताना ते म्हणतात”मुलामुलींची वीण वाढविणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बंधने ह्याला जर संसार म्हणावयाचे असेल तर असले संसार हे कावळ्या चिमणेही करीतच आहे ” अस आपल्या पत्नीला समजावतात तेव्हा ते वाचताना अगदी तर मन पेटून उठत, बारीबाबा नावाचा जेलर आणि त्याने तयार केलेल्या अंदमानच्या नियमावली… म्हणजे त्या अंदमानात बारी बाबा म्हणेल तो दिवस असेल अणि म्हणेल ती रात्र असेल ह्या सगळ्या गोष्टी सहन करून कारागृहात सुध्दा क्रांती चे विचार पेटवनारे अणि तेथील लोकांना चोरून शिक्षित करणारे एकमेव क्रांतिकारक म्हणजे वि. दा. सावरकर . नथुराम गोडसेने अणि गांधी हत्या ह्या गोष्टी हे पुस्तकं वाचल्यावर आपल्या नक्की लक्षात येतील हे पुस्तकं तुम्ही कधीतरी नक्की वाचा, तुम्हाला तुम्ही हालअपेष्टामधे जगात आहात काही शरारिक त्रास असेल तो कधीच जाणवणार नाही. शरद पोंक्षे यांच्या केमो थेरपीच्या वेळी होण्याला त्रासाला उत्तर म्हणून या पुस्तकाचं वाचन केलं होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *