मराठी बाराखडी
बाराखडी ही मराठी भाषा शिकण्याचा पाया आहे. पण बाराखडी फक्त मराठी भाषेसाठी मर्यादित नसून तिचा वापर इतर देवनागरी भाषा जसे कि हिंदी, संस्कृत आणि नेपाळी भाषेत देखील आढळतो. बाराखडी चा शब्दशः अर्थ बारा: १२ खडी: उभ्या पंक्ती; म्हणजेच स्वर + व्यंजनांच्या १२ उभ्या पंक्ती किंवा तक्ता. बाराखडी तोंडपाठ करण्यासाठी सहसा ती एका सुरत म्हटली जाते - क का कि की...
शाळेत शिक्षक देखील विद्यार्थ्यांना एका विशिष्ट चालीत बाराखडी शिकवतात. बाराखडीमुळे उच्चार सुधारतात, लिखाण आणि व्याकरण देखील सुधारते. असे असले तरी "मॉडर्न" मराठी भाषेत बाराखडीमधील बरेचसे अक्षरं क्वचितच वापरले जातात. १२ स्वर आणि ३६ व्यंजनं मिळवून बाराखडीमध्ये ४३२ विविध अक्षरं तयार होतात.
क |
का |
कि |
की |
कु |
कू |
के |
कै |
को |
कौ |
कं |
कः |
ख |
खा |
खि |
खी |
खु |
खू |
खे |
खै |
खो |
खौ |
खं |
खः |