
काजव्यांचं झुंबर!
या काव्यसंग्रहाला मिळालेल्या, पहिल्या आवृत्तीच्या भरगोस यशानंतर, आता दुसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल!
काव्यसंग्रह : काजव्यांचं झुंबर!
कवी : अक्षय सतीश गुधाटे.
किंमत : १५० रुपये.
अक्षय सतीश गुधाटे.
“काजव्यांचं झुंबर” या माझ्या कविता संग्रहात सगळ्याच कविता वेगवेगळ्या आहेत. त्यांना ठराविक असा आशय नाही, विषय नाही, छंद नाही, वृत्त नाही.. हे सारेच संवेदनांचे मुक्त काजवे आहेत, मला जमतील त्या प्रमाणे झुंबराच्या स्वरूपात तुमच्याकडे सुपूर्त करीत आहे. आशा करतो तुम्हाला हे काजवे आवडतील, तुमची त्यांच्याशी जवळीक होईल आणि आयुष्यभराच्या सोबतीचा दुवा बनतील.
तुमच्या प्रतिक्रिया कंमेंट्स द्वारे नक्की माझ्यापर्यंत पोहचावा.

पाण्याच्या खोल तळाशी पडलेला शब्द तरंगून आल्यावर त्याचं फूल होतं का??
तसंच झालं आहे या काजव्यांच्या झुंबरातील कवितांचं …
या कविता वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर आपलं एकंदरीत असणंच मांडत आहेत… या दृष्टीने बघितलं तर या कविता आपला भोवताल पण विसरत नाहीत, उलट तो भोवतालच कवेत घेताना दिसतील…
खरंतर अक्षय दादा कितीही निरागसपने तसे त्यांचे कुठल्याही भावनांशी घेणे देणे नाही, असं म्हणत असले. तरीसुद्धा पुन्हा याच कविता वाचताना त्यांच्याही त्या क्षणांचा मोर होत असेलच.. भर उन्हातही… आणि विस्कटलेल्या पाकळ्यांसारखं त्यांचं आयुष्य सुद्धा बहरण्यासाठी हे अक्षयरूपी काजव्यांचा झुंबर नक्कीच निमित्त ठरत असेल…
कविता खुप आवडल्या 😍😍…
पुढील अवृत्तीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
❤️खुप खुप आभार!!!❤️
Finally..
इतक्या प्रतीक्षेनंतर आणि इतकी उत्सुकता असलेलं काजव्यांचं झुंबर हाती पडलं.😌
पुस्तकाच्या नावाप्रमाणेच एक आणि एक कविता स्वतःमध्ये खास आहे. जसं काजव्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा प्रकाश असतो अगदी तसं!!
कविता वाचल्यानंतर कुठे ना कुठे आपल्याशी निगडित आहेत की काय असं वाटत होतं. आपल्या जवळच्या आहेत असं वाटतं.♥️
मायबाप, देव वेशीवर टांगलाय, मोठी झालीस, चहा ह्या कविता तर खूपच भावल्या.
सगळ्या कवितांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे.. जसं समुद्राच्या किनारी चालता-चालता अनेक शंखशिंपले आपल्याला मिळतात, प्रत्येकाची वेगळी ठेवण, वेगळे रंग, वेगळी वैशिष्ट्य पण सगळेच आपल्या मनाला भावतात. तशा तुझ्या सर्व कविता आहेत असं मला वाटतं.. आणि या सर्व कवितांनी मिळून तुझा छानसा झुंबर तयार झाला आहे.💫
तुझ्या कापूरवेल या कवितेत तुझी कविता कशी असावी याबद्दल लिहिलं आहेस.. अगदी तंतोतंत तसंच होतं तुझ्या या सगळ्या कविता वाचल्यानंतर, अंगी भिनतात असं म्हणायला काही हरकत नाही..
तुझ्या या यशस्वी पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन आणि असा हा इतका सुंदर खजिना आम्हा वाचकांना दिल्याबद्दल आभार.😊🙏🏻
😍खुप खुप आभार!😍
माझ्या हाती पुस्तक पडलं अन मला जो आनंद झाला तो अवर्णनीय होता🥳. अगदी नावाप्रमाणेच हे काजव्यांचे झुंबर अनुभवताना देखील तेजोमय भासत. ☺️कविता संग्रहास एकाच भावनेची पार्श्वभूमी असावीच अस काही नाही आणि याच सुंदर उदाहरण म्हणजे अक्षय दादाचे हे झुंबर🙌 प्रत्येक कविता वाचताना तोंडून वाह वाह चे उदगार आल्यावाचून राहत नाही.👌देव वेशीवर टांगलाय, मोठी झालीस, पाऊस या व अश्या बऱ्याच कविता मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत💗पुस्तकाच्या शेवटास वाटत होतं याची पान वाढत जावो संपूच नये💯🍀..खूप छान.👍 वेळात वेळ काढून पुस्तक पोहचवल्याबद्दल खूप सारे आभार. तुझे हे काजव्यांचे झुंबर नेहमी अक्षय राहो, अगदी तुझ्या नावाप्रमाणे. तुझे करावे इतके कौतुक कमी आहे. आम्हा वाचकांना दिलेल्या या सुंदर भेटीसाठी आभार. तुझ्या पुढच्या प्रवासास खूप शुभेच्छा💐.अशाच नवनवीन पुस्तकांसहित तू भेटत राहो🙌💗💃🎀🤗🎉
🤗खुप खुप आभार!🤗
अक्षय दादाच्या काजव्यांचं झुंबरने मनाला दिल सुख,😍
हलके होत गेले लपलेले दुःख,🙂
त्याच्या कवितेत आहे जणू एक अतरंगी चाल,✨
त्याच्या शब्दांत आहे एक जादूची ढाल..!💯
– खरं म्हणजे मी सुद्धा कधी कविता वाचत नव्हतो पण, खरचं ह्या अशा कविता आहे ज्यांना काही विषय नाही पण मनावर खोल रुजणाऱ्या ह्या कविता आहेत. आज अक्षय दादा एक “कवी” म्हणून आपल्या भेटीस आला आणि काजव्यांचं झुंबर आपल्या हातात देऊन एक वेगळी वाट निर्माण करून गेलाय. अक्षय दादा बद्दल बोलावं तितकं कमीचं आहे अगदी मोठ्या भावाप्रमाणे मला प्रत्येक वेळी तो मदत करत असतो, आणि योग्य मार्ग दाखवण्यात तो नेहमी अग्रेसर असतो…
आता वाट बघू नका प्रत्येकाने आजचं आपली “काजव्यांचं झुंबर” प्रत ऑर्डर करा…
अगदी मनापासून पुढीस वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐📚📚…
🤗खुप खुप आभार!!🤗
🌟”काजव्यांच झुंबर”🌟
अप्रतिम शब्दरचना अक्षय 👍 अगदीच मनाला भिडणारी🤗
मी excited तर होतेच वाचण्यास की नक्की काय असेल ह्यात, ह्याच्याशी जमेल की नाही आपलं कळणार की नाही, खूप प्रश्न होते पण तेवढीच उत्सुकता सुद्धा वाचण्याची😊
आणि Finally आमची भेट झाली।।🤗
“काजव्यांच झुंबर” घरी आणताच आणि कविता संग्रह बघताच आईला झालेला आनंद आणि त्याक्षणी तिला आठवलेले काही गोड क्षण आजोबांच्या कविता❤
खरच ह्या आनंदमय क्षणासाठी तुझे मनापासून आभार 🙏💛
प्रत्येक कवितेत काहीतरी वेगळं,नवीन भाव,आठवण आणि आपलेपणा✨
खूप खूप म्हणजे खूप आवडल्यात तुझ्या कविता🤩
अव्यक्त ,पाऊस ,मनोरंजन ,आजोबांचे व्याकरण ,माझा मी,राधा,विश्राम,अशी तू,मित्र,बाबा,चूक
ह्या अगदी जवळच्या आणि जुनं नातं असल्यासारखं वाटतं💖
वाचलं तर वाचतच राहु वाटतं,
कविता ही गोड आणि त्यामधले शब्द ही गोड,
तु कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेले भाव आणि शब्दरचना त्याहुन गोड,
खूपच सुंदर❣️
शब्दात तुझ्या हरवून गेले, जणू कवितेत गुंतून गेले
काजव्यांसारखा व्यक्त तु झालास आणि झुंबराच्या त्या लख्ख प्रकाशाने जग बदलून माझे गेले ✨🌟
कविता सूचणे हे खरंच भाग्यशाली असण्याचे लक्षण आहेत..
आणि अप्रतिम, गोड अश्या कविता काजव्यां मार्फत आमच्या पर्यंत पोहोचवल्यास हे आमचे भाग्य आहे😇
अश्याच उत्तमोत्तम कविता तुझ्याकडून होवोत
आणि त्या निमित्ताने आम्हा वाचकांची आणि तुझ्या कविता संग्रहाची भेट होत राहो🤘💛
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा😍
आणि मन:पूर्वक अभिनंदन 🤗😊
Proud of u Akshay…शब्दांचा खेळ, मांडणी आणि कवितेतून तुझं व्यक्त होणं, खरच तू खूप Great आहेस☺
🤗खुप खुप आभार!!🤗
मनापासून लिहिलेली प्रत्येकच कविता ही अप्रतिम असते… शब्दातीत असते. लोकांसाठी, मानधनासाठी किंवा कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लिहिलेल्या या शब्दारूपी काजव्यांच्या झुंबराने काळजात अगदी खोलवर प्रकाश पाडला. पुढल्या पुस्तकाची आतुरतेने वाट. खूप शुभेच्छा…!!!
काजव्यांचं झुंबर हे तुझं कवितांचे पुस्तक माझ्या हाती आलं ते अगदी रक्षाबंधनच्या दिवशी आणि मला खरंच खूप आनंद झाला . म्हणजे मी तुला दादा बोलते आणि पुस्तक मला मिळालं तेही अगदी रक्षाबंधनच्या दिवशी .😊 पुस्तकातील सगळ्या कविता खूप छान आहेत. तुझ्या कविता अगदी मनावर खोल रुजणार्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या आयुष्याशी रिलेट करतात असं मी म्हणेन. पाऊस ,ओंजळ, देव वेशीवर टांगलाय ,चूक, राधा ,राम राम ,कापुराचे हसू ,कापूर वेल अगदी सगळ्यात कविता आवडल्या .
तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा.
🤗खुप खुप आभार!!🤗
प्रत्येक मनात एक काजवा लुकलुकत असतोच..
आज पुस्तक पूर्ण वाचून झाले..
अप्रतिमच..💫
पुस्तकातील प्रत्येक कविता अनुभवताना मन अगदी पूर्णपणे बालपणात जात. काही कविता मनाला प्रसन्नता, देतात तर काही मनातील भावना जागृत करतात.एक क्षण अस वाटतं की बालपण पुन्हा नव्याने अवतरतलं आहे..
खरंच खूप छान आहे ते सगळ वास्तविक आणि काल्पनिक मांडलेलं जग..
अस बोलतात पुस्तक माणसाला घडवतं.. पण थोडं यापुढे जाऊन सांगेल पुस्तक माणसाला जोडत पण..
उदाहरण द्यायचं झालं तर तुझी माझी नवी मैत्री..💞
असो.. खरंच खुप छान लिहीलं आहेस.. पहिल्याच प्रयत्नात अस काही विलक्षण लेखन करून मन जिंकलीस..
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!
असंच नव नवीन तुझ्याकडून घडतं राहो आणि ते आमच्यापर्यंत पोहचत राहो!
आणि आता पुढील नव्या गोष्टीची उत्सुकता राहील..💫
🤗खुप खुप आभार!!🤗
पहिलीच कविता काजव्यांचं झुंबर लक्ष वेधून घेते.
काळीज,कापुरवेल ,ओंजळ,चौकटी ,संबंध, गाढव, व्यास, पिंपळपान ,काळोख ,तू अन मी ,पाऊस ,कापुराचे हसू ,शाळा, उदास लाटा, दिवे , शब्दांना जन्म देणारी आणि, खंत, व्याकुळ, बाबा ,तमाशा ,हल्ली, मिठीत, थट्टा ,होते…आहे या कविता मनाला खूप भावल्या, खूप आवडल्या. सगळ्याच कविता त्या-त्या चौकटीमध्ये मुक्त वावरणाऱ्या आहेत .खूप छान प्रकारे मांडलेल्या आहेत.👍😊
तुझी ही कापुरवेल उंच वाढत वाढत काजव्यांचं झुंबर होऊन अंधाराला दूर सारत उंच उंच वाढत आहे. तीने अशीच वाढत गरूडा प्रमाणे उंच आकाशात भरारी घ्यावी हीच सदिच्छा.. पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा.💐💐
खुप खुप धन्यवाद!!🤗
“वाचकांशी बोलणारे संवेदनांचे मुक्त काजवे”
अक्षय १०८ कवितांचं चमचमणारं झुंबर घेऊन आपल्या भेटीला आला आहे!
———————
चंद्रावरीच्या खेड्यात राहणाऱ्या साऱ्या कवींच्या घराला लटकणारी “काजव्यांची झुंबरं”
प्रेमाचं “काजळ”
उरी दडलेल्या अहंकाराला फास “देणं”
भेदक “देव वेशीवर टांगलाय”
चंद्र चांदण्यांची रोजनिशी “स्वप्नभंग”
“अव्यक्त” दाहकता
अफाट “तू..नि..मी”
दुधारी कट्यार “असाच”
न बदलणाऱ्या “चौकटी”
गहिरी “जखम”
निडर “माझाच गुन्हा”
काजवांचे अक्षय झुंबर “काळोख”
आर्जवी “मी काय सांगतोय”
मन हेलावणारं “आजोबांचं व्याकरण”
खटकेबाज “तू”
सांगून, भंगून, रंगून “ती गेली”
“आणि” शब्दाचा पुनर्जन्म
धन्य रचना “कमविण्या पुण्य मी”
चांदणीची “खळी”
न चुकता होणारी “चूक”
बदललेली ती “हल्ली”
ऑप्टिमिस्टिक “एक वादळ”
“मिठीत” कोण जाणे
कवितांची “बेडी”
———————
आपले अनुभव, कवीचे अनुभव, कवीच्या संवेदना, विचार व शब्द यांचा हवाहवासा कॅनव्हास म्हणजे “कवितांचं झुंबर”. कवितांना पूरक रेखाटनांसह….।।
सगळ्यात आधी एक वाचक म्हणून मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पुस्तक वाचण्यास थोडा उशीर झाला. पण या नवीन वर्षाची नवीन सुरुवात तुझ्याच या “काजव्यांच्या झुंबरा” पासून झाली.
खर तर मी वाचलेल कवितांच हे पहिलच पुस्तक त्यामुळे इतर पुस्तकांसारख हे पुस्तक मी नाही वाचल. कविता म्हटल की कागदावर स्पष्ट दिसणाऱ्या अक्षरांव्यतिरिक्त सुद्धा बरच काही असत आणि ते ” बरच काही” जे आहे त्याचा अर्थ मी माझ्या परीने लावण्याचा प्रयत्न केलाय. बर्याच कविता आपल्याच भावना मांडतायत असही वाटल. आपल्याला जे सांगायचय तेच या कविता सांगत होत्या. आणि मला वाटतं एक कवी म्हणून तुला जे काही वाचकांपर्यंत पोहोचवायचय त्यातल कदाचित सगळच नाही पण काही अंशी तरी माझ्यापर्यंत नक्कीच पोहचलय.
वर्षाची सुरुवात तर छानच झाली आणि काजव्यांच हे अक्षय झुंबर त्याच्या प्रकाशात वेळोवेळी मार्ग दाखवत राहील हे नक्की.
काजव्यांच हा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचवलास त्याबद्दल मनापासून आभार आणि पुढील पुस्तकासाठी शुभेच्छा.😊
खुप खुप आभार!!