shala marathi novel

शाळा

पोस्ट शेयर करा:

लेखक – मिलिंद बोकिल

पृष्ठसंख्या – ३०३

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

मुल्यांकन – ४.६ | ५

मतलबी जगात वावरत असताना, शाळेच्या आठवणीने उर भरून येतो. त्या निर्व्याज प्रेमाने मन गहिवरून येत. रोजच्याच व्यापातून थोडा वेगळा विचार, शाळेच्या आठवणी, जुन्या बालमित्रांची संगत काही विस्कटलेले क्षण पुन्हा नीट करून जाते. मला प्रतिकूल वेळात आनंद देणाऱ्या त्या क्षणांच मला भलतंच अप्रूप वाटतं. आणि या काही क्षणात शाळेचं स्थान नक्कीच अग्रणी आहे.

आपण सर्वच शाळेशी काही ना काही आठवणीने जोडलें गेलो असतो. अगदी कधीच शाळेत न गेलेल्या माझ्या काही मित्रांच्या सुद्धा शाळेशी निगडित अगणित किस्से आणि आपसूकच आठवणी आहेत. वेताची छडी, रंगीत खडू, नायलॉनच दप्तर, तुटके बाक अश्या अनेक गोष्टींना शाळा हे एक नाव उजाळा देऊन जात. यातच लहानग्या बालमित्रांची जोडी म्हणजे गोष्टच काही और. आणि यात दुग्ध शर्करा म्हणजे विटी दांडू, सुर पारंब्या आणि असे बरेच खेळ.

पुस्तक वाचत असताना अशा विविध आठवणीं तुम्हाला व्याकूळ करीत राहतील, अनेक किस्से डोळ्यांसमोर जसे च्या तसे उभे राहतील हीच लेखकाच्या लेखणीची किमया आहे. प्रसंगवर्णन विलोभनीय आहे. लहानशा गावात बालसुलभ मुलांना नकळत झालेल्या प्रेमाचं हे पुस्तक आहे. एका इवल्याशा जगात गोजिरवाण्या सुंदर मुलीच्या येण्यामुळे नकळत झालेल्या बदलाचे, आनंदाचे आणि घटनांचे हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. आई, बाबा, मामा, सुऱ्या, बगळ्या, आंबेकर सगळेच पात्र लेखकाने दर्जेदार लिहली आहेत आणि ओळख करून दिली आहे. यात प्रेम आहे, लोभ आहे, रुसण आहे, पाठलाग आहे, लपून बघणं आहे, रडणं आहे आणि बोधही आहे. आणीबाणीचा काळ, घरावर घटांनाचा झालेला परिणाम आणि दोघांच्या प्रेमाची गोष्ट लेखकाने लीलया गुंफली आहे.

पुस्तकात प्रत्येक पात्र वेगळं आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत. मामाच “Fame is the fragrance of heroic deeds, flowers of silvery and not of Leeds” हे वाक्य आजूनही माझ्या मनात रुतलेल आहे. पडद्यामागील पात्रांना आणि घटनांही लेखकाने सुरेख रंग, सुरेख कल दिला आहे. पुस्तक वाचत असताना सुंदर गोष्ट, दर्जेदार पात्र आणि घटनांची उजळणी साऱ्याचाच मेळ तुम्हाला खुश करून जाईलच याची खात्री आहे. आयुष्याच्या डोळ्याला लेखकाने लावलेले काजळ डोळ्यात पाणी आणेलही, पण चित्र नक्कीच स्वच्छ दिसेल यात शंका नाही. पुन्हा तरूण होण्यासाठी एकदा नक्की वाचा “शाळा”.

पुस्तकाच्या शेवटी लेखकाच्या लेखणीला जो एक मार्मिक, हळवा साज आलेला आहे तो भाग अवर्णनीय आहे. तो मी तासाच्या तसाच लिहावा अस वाटतं. ” त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसरखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिक्षण फार सुंदर आहे. “

shala milind bokil mauj kadambari akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/1876/shala—-buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

2 Comments

 • #शाळा…
  त्या दिवशी मला कळल की शाळे ची खरी मज्जा कशात आहे ते…वर्गात आहे, बाकात आहे, पोरापोरिंन मध्ये आहे सर आहेत गणित आहे भूगोल आहे नागरिक शास्त्र सुद्धा पण… आपण त्या कशातच नाही आपण त्या गायीच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्षांन सारखं मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो जरी असलो तरी आपल्या मनात एक वेगळी शाळा भरते खास एकट्याची त्या शाळेत वर्ग नाहीत फळा नाही शिक्षक नाही भिंती नाही पण त्यातलं शिक्षण फार सुंदर आहे… ❤️????,????
  .

  हे पुस्तक आपल्याला शालेय जीवनात परत आणते, आपले वाढते दिवस..आपल्या गोष्टींना उदासिन बनवते, आपल्याला हसवते, हसवते, यामुळे आपल्याला पुन्हा जिवंत बनवते आणि आपल्या शालेय जीवनातील सर्व कडू, गोड, मूर्ख, पण संस्मरणीय क्षण खेळायला लावतात .. आणि सरतेशेवटी ते तुम्हाला कोणत्याही खोल पाण्याच्या विहिरीमध्ये फेकते ज्याशिवाय कोणतेही फ्लोटिंग डिव्हाइस नसते आणि पोहता कसे जावे हे आपणास माहिती नसते … अगदी आयुष्याप्रमाणेच !!
  मुकुंद जोशी चौदा आणि नव प्रेमात आहेत. तो तिच्या वर्गमित्र, शिरोडकरसारख्या खासगी शिकवणीला फक्त तिच्या एक झलक्यासाठी उपस्थित राहतो आणि दररोज तिच्या घरी परत जातो. दुर्दैवाने, तिला तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा एक संकेत नाही, कारण त्यांच्या समाजात मुले व मुली मुक्तपणे संवाद साधत नाहीत, प्रेमाबद्दल कमी बोलतात. जेव्हा तो प्रेमाच्या कपड्यांशी संवाद साधत नाही, तेव्हा मुकुंद शाळेच्या शेताभोवती बसतो किंवा त्याच्या जवळच्या मित्र, सूर्य, चित्रे आणि फवद्यासमवेत शहराभोवती फिरतो, टीव्ही विरुद्ध रेलिंग करतो शिक्षण व्यवस्था आणि शिस्त आणि बोहेमियानिझम सारख्या वादविवाद कल्पना. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात छोट्या महाराष्ट्राच्या एका छोट्या गावात वसलेल्या शला ही किशोरवयीन संघर्षांबद्दलची हृदयविकार व काल्पनिक कादंबरी आहे जी रिअल टाइममध्ये अत्यंत पिछाडीवर आहे म्हणून ते मागे वळून पाहत आहेत.
  . @bookpadhlo – सिद्धी विचारे

 • शाळेत गेलेल्या (खासकरून मराठी माध्यमात शिकलेल्या) सर्वांसाठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *