shyamchi aai marahi book

श्यामची आई

पोस्ट शेयर करा:

लेखक – साने गुरुजी

पृष्ठसंख्या – २५६

प्रकाशन – पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन

मुल्यांकन – ४.९ | ५

आई… प्रेमाची, रागाची, मायेची, त्यागाची, हसण्याची अन् सोसण्याची एकमेव जागा. हक्काने कोणतीही गोष्ट आपण बोलू शकतो तिच्याशी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच आईशी एक वेगळी नाळ जोडलेली असते. जगाला माहित होण्या आधी ९ महिने आपली तिच्याशी ओळख होते… आपली इवली बाळमुठ हातात घेऊन आपल्यासाठी कितीतरी सहन करण्यासाठी आईचच काळीज हवं.

अशाच एका आई-मुलाच्या निर्मळ नात्याच हे पुस्तक. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्कारांची ही एक छोटीशी गोष्ट आहे. यातील प्रत्येक पाठातून नक्कीच उत्तम बोध मिळतो. आणि तो बोध कसा द्यावा याचीही शिकवण अगदी सुंदर मांडली आहे. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र आहे. हे पुस्तक पवित्र आहे जिव्हाळ्याने ओतप्रोत आहे. आणि आचार्य अत्रे म्हणातात तसे हे पुस्तक म्हणजे महामंगल स्तोत्र आहे. याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे. गुरुजींनी तुरुंगात लिहलेल्या या सर्वच रात्री तुम्हाला गहीवरून आणतील.

यातील प्रत्येक रात्र नवीन बोध कसा देते यात एक वेगळीच गम्मत आहे. स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यामधे सर्वांनाच याचा उपयोग होईल. मुकी फुले देवास ही आवडत नाहीत. पायस घाण लागू नये म्हणून जसा जपलास तसे मनास घाण लागू नये म्हणून जप सांगणारी आई लुगडे अंथरते तेंव्हा डोळ्यांत साठलेलं पाणी ओसांडून वाहते. पत्रावळ, भूतदया, अशा अनेक कथांनी हे पुस्तक वेलीप्रमाने फुलले आहे. श्यामला पोहता यावे यासाठीचा आईचा आटापिटा, स्वाभिमान, मिंधेपणा यांची जवळून ओळख.

बंधुप्रेमाची शिकवण चिंधीच्या गाण्यातून वाचताना अंगावर शहारे येतात. तर उदार पितृहृदय वाचताना प्रत्येक बापाने केलेल्या कष्टाचे चीज होते असे मी म्हणेन. 

“घनदाट या रानात, धो धो स्वच्छ वाहे पाणी,

माझ्या श्यामच्या जीवनी, देव राहो ||”

यातील करुणा भाव मनाला सतत जाणीव देत राहतो. तर सांब शिवा पाऊस दे… बोलणाऱ्या इवल्याश्या ओठातून स्वतः कोणत्याही गोष्टीसाठी कसे झटावे, कसे आपल्या परीने मदत करावी हेच दिसून येते. या पुस्तकातील सगळच अगदी साफ, निरागस मनाने वाचावं अस आहे. 

सुखदुःखाच्या पलिकडे जाऊन, मातीशी एकरूप झालेल्या अनेक कथांची ही एक माळ आहे. जी तुम्हाला समृद्ध करेल. हे पुस्तक माझ्या सगळयात जवळच आहे, मी माझ्या प्रत्येक वाढदवसानिमित्त हे वाचतो. पुन्हा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा प्रेमाचं नातं शोधतो. मला खात्री आहे तुम्हाला देखिल हे पुस्तक वाचताना मनाचा एक कोपरा नक्की सापडेल.

shaymchi aai sane guruji katah akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/2721/shyamchi-aai—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *