vyakti aani valli book review

व्यक्ती आणि वल्ली

पोस्ट शेयर करा:

लेखक – पु. ल. देशपांडे

पृष्ठसंख्या – २०२

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

मुल्यांकन – ४.९ | ५

आयुष्याच्या वाटेवर मिळालेली माणसं कोणाला आठवत नाहीत. माफ करा भेटलेली माणसं. वस्तू मिळतात, माणसे भेटतात. त्यातीलच काही नाते जोडून जातात. काही व्यक्ती असतात तर काही निव्वळ वल्ली. अशाच काही भाईंना आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींची नि आपसूकच वल्लींची त्यांनी आपल्या लेखणीतून उभारलेली ही व्यक्तिचित्रे वर्षानुवर्षे वाचकांच्या मनावर राज्य करत आली आहेत.

पुलंनी यात २० व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत. नुसतीच रेखाटली नाहीत तर त्यात रंगही अगदीं लाजवाब भरले आहेत. विनोदात मांडलेली सत्याची परखड लकिर मनाला जाणीव करून देत राहते ही त्यांच्या लेखणीची जादूच म्हणावी लागेल. त्यांचं साहित्य कोणत्याही वयोगटात वाचलं तरी तितकच सकस आहे. ही व्यक्तिचित्रे नक्कीच तुम्हाला तुमच्या आसपास मिळतील.

नारायण सारखे निर्मोही कोणतही जवळचं नातं नसलेले नातलग असतीलच, हरितात्या ज्या इतिहासात वावरतात किंवा जे इतिहासच जगतात असेही नक्कीच तुमच्या परिचयाचे असतील. नामू परीटाप्रमाने सदा कपड्यात राहणारा नागवा माणूस तुम्ही विसरूच शकत नाहीत. छापखान्यात जीभ लावलेल्या सखाराम गटण्या प्रमाणे जीभ चालवणारे ही मिळतीलच. नंदा सारखे समजात समजसोडून वावरणारे ही असतील नि भैय्या नागपूरकर सारखे शेरोशायरी गाजवणारेही मिळतीलच.

जेंव्हा बाबा रे… म्हणणारा नाथा, “तिला माहित असेल का रे मी तिच्या आवडीचा मिश्चिफ सेंट आजुन लावतो ते” म्हणतो तेंव्हा मात्र दुसऱ्या बाजूचं नाण देखील स्पष्ट खुलत. चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपलांच्या टाचा डोळ्याच्या काचा साफ करतात तर पेस्तन काका जीवन प्रवास उलघडतात. बबडू ने सहन केलेला काळ नी ऐटीत जगणारा वर्तमान यांचा गोफ दुहेरी विनाला असला तरी नाजुकच. आणि अंतू बर्वा आणि त्याची मित्रमंडळी, त्यांचे खोचक पण वास्तववादी शेरे, अन् आपसूक एकटेपणात मनात सुरुंग करणारी एक विदीर्ण पोकळी तुम्हाला अस्वथ करत राहील. हीच या पुस्तकाची खरी गम्मत आहे.

पु. ल. बद्दल लिहताना अथवा बोलतानाही उर अभिमानाने, डोळे पाण्याने आणि मस्तक विचारांनी भरून येते. त्यांच्या स्वप्नरंगी दुनियेत या व्यक्तींचा सहवास आपण अनुभवलात तर हास्य स्फोट तर होतीलच पण मनाची बुरशी अलगद निघून जाईल आणि पुन्हा टवटवीत मनाने आयुष्यावर प्रेम कराल याची मला खात्री आहे.

vyakti aani valli pul deshpande pl p l mauj laghu katha akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/12716/vyakti-ani-valli—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

2 Comments

  • कपडयात राहणारा नागवा माणूस…, एकटेपणात मनात सुरुंग करणारी एक विदीर्ण पोकळी…वा! उत्कृष्ट शब्दांकन!

  • पु. ल. पेक्षा सुंदर व्यक्ती वर्णनं दुसरं कोणीच करू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *