complete sherlock holmes marathi book cover

संपूर्ण शेरलॉक होल्म्स

पोस्ट शेयर करा:

लेखक – सर आर्थर कॉनन डायल 

अनुवाद – गजानन क्षीरसागर

प्रकाशन – अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स

मूल्यांकन – ४.५ । ५

सर आर्थर कॉनन डायल  यांनी १८८७ ते १९२७ या कालावधीत शेरलॉक होल्म्सवर एकूण ६० कथा लिहल्या. या कथा जगभरात प्रचंड लोकप्रिय झाल्या आणि आजही त्या आवडीने वाचल्या जातात. या कथांवर असंख्य मालिका, चित्रपट आणि नाटकं येऊन गेली. मुळात शेरलॉक होल्म्स हे व्यक्तिमत्वच लेखकाने इतक्या ताकदीने उभं केलं आहे कि त्याची तुम्हाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. 

शेरलॉक होल्म्स हे एक काल्पनिक पात्र पण त्याची लोकप्रियता एवढी कि लंडनमध्ये त्याच्या नावाचं संग्रहालय आहे. पुस्तकात दिलेला पत्ता म्हणजेच २२१ बी बेकर स्ट्रीट हा आता सर्वश्रुत झाला आहे.

या कथा आहेत शेरलॉक होल्म्स या खाजगी गुप्तहेराच्या. या कथा आपण डॉ. वॉटसन म्हजेच शेरलॉक चा मित्र आणि त्याला प्रत्येक रहस्य सोडवण्यात मदत करणारा साथीदार याच्या दृष्टीने वाचतो. शेरलॉक एक अवलिया व्यक्तिमत्व आहे. गुन्हा कोणी केला आहे ते शोधण्याची त्याची स्वतःची एक पद्धत आहे. त्याची बुद्धी प्रचंड वेगाने काम करते आणि गुन्ह्यांतील पुरावे जोडण्यासाठी तो चिलीम ओढून शांतपणे विचारांच्या जगात हरवून जातो आणि एका ठाम निष्कर्षापर्यंत येतो आणि त्याचा निष्कर्ष सहसा चुकत नाही.

शेरलॉकच्या गुन्हयाचा माग काढायच्या पद्धती लेखकाने कल्पना करून लिहिल्या होत्या पण त्या वाचकांना वास्तविक वाटतात आणि त्यामुळेच तत्कालीन लंडन पोलिसांनी खुद्द लेखकालाच गुन्ह्याच्या तपासासाठी पाचारण केल होत. आजही या पद्धतींचा अभ्यास पोलीसखात्यांमध्ये होतो.

पुस्तक वाचताना या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही बरेच दिवस बारीकसारीक गोष्टींचं निरीक्षण करू लागाल. कथेचा कालखंड २० व्या शतकातील आहे आणि कथा इंग्लंडच्या विविध भागांमध्ये घडते. कथेत असलेली नाव आणि स्थळं मराठी वाचकांना लक्षात ठेवताना थोडी कसरत करावी लागते. प्रत्येक कथा तुम्हाला शेरलॉकबरोबर एका रहस्यमयी जगात घेऊन जाते आणि तुम्ही देखील त्या रहस्याचा तितक्याच उत्कटतेने उकल करण्याचा विचार करू लागता.

अर्थातच कथा कुतूहल वाढवितात, विचार करायला भाग पाडतात. या कथा २० व्या शतकाच्या सुरुवातीला लिहल्या होत्या त्यामुळे तत्कालीन इंग्रजी आणि पार्शवभूमी समजून घेऊन अनुवाद करणे म्हणजे मोठं आव्हानात्मक काम आणि ते गजानन क्षीरसागर यांनी उत्तमरीत्या पूर्ण केलं आहे. हा कथासंग्रह मराठीत आणल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. जर तुम्हाला रहस्यकथा आवडत असतील तर संपूर्ण शेरलॉक होल्म्स तुमच्यासाठी पर्वणी ठरेल. 

arthur conan doyle gajanan shirsagar sherlock holmes adventures detective suspense akash jadhav story collection


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/8242/sherlock-homeschya-rahasykatha—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



इतर मराठी आवृत्या अमॅझॉन वर बघा

इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या



संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *