the alchemist marathi book cover

द अल्केमिस्ट

पोस्ट शेयर करा:

लेखक – पाउलो कोएलो

अनुवाद – डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

पब्लिकेशन – मंजुळ पब्लिशिंग हाउस

हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले पुस्तक १९८८ च्या सुमारास प्रकाशित झाले. अल्केमिस्ट या शब्दाचा मराठी अर्थ होतो किमयागार. ही किमया आहे अशक्य असलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेची. एका गावात राहणारा मेंढपाळ ते त्याचा खजिन्याचा शोध हा रंजक आणि संघर्ष पूर्ण प्रवास लेखकाने अतिशय परिणामकारक पद्धतीने मांडला आहे. सर्वांना त्यांच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक वैश्विक शक्ती कार्यरत असते, ही वैश्विक शक्ती तुम्हाला तुमच्या स्वप्नाबद्दल सदैव आठवण करून देत असते, मात्र तुम्ही त्याकडे जर दुर्लक्ष केलात तर ती शक्ती देखील तुमच्या इच्छेनुसार तुमच्या स्वप्नांना तुमच्या पासून दूर घेऊन जाईल.

तुमच्या स्वप्नांवर प्रेम करण्याचा, ते प्रत्यक्षात येण्यासाठी संघर्ष करण्याचा मंत्र देतानाच तुमच्या स्वप्नासाठी एक वैश्विक शक्ती सदैव स्वतःला झोकून देऊन तुम्हाला तुमच्या इप्सित ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असते. ही शक्ती अनेकदा जाणीवपूर्वक तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करून तुमची स्वप्नांसोबत असलेली बांधिलकी तोडण्याचा प्रयत्नही करतीलही पण जे त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग सोडणार नाही तेच खरे किमयागार ठरतील आणि जग जिंकतील.

या कथेमध्ये स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी मिळालेली प्रेरणा, एका अनोळखी प्रदेशाच्या दिशेने सुरु असलेला प्रवास, सर्व काही गमावल्यानंतरही जग जिंकण्याची असलेली उर्मी, आपली जीवनसाथी मिळूनही तिच्या प्रेमापोटी स्वप्नाचा पाठलाग न थांबवण्याचा दिलेले सल्ला असे एक ना अनेक प्रसंग वाचकाला कथेशी जोडून ठेवतात. शाकुनांचा अर्थ, शब्द विरहीत भाषेचे असलेले अस्तित्व हे वैश्विक शक्ती कार्यरत असल्याचे जणू संकेतच असल्याचा निष्कर्ष या कथेच्या आधारे निघतो.

या पुस्तकातून सर्व वाचकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची किमया गवसेल हीच सदिच्छा…..

alchemist kimayagar paulo coelho majul katha motivational rohit mohite


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/1927/the-alchemist—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या


संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

रोहित मोहिते

View all posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *