the fifth mountaiin marathi book cover

द फिफ्थ माउंटेन

पोस्ट शेयर करा:

लेखक –  पाउलो कोएलो

पृष्ठसंख्या – २५६

मूल्यांकन – ४.४ | ५

असामान्य आणि अलौकिक तत्वज्ञानामुळे पावलो यांनी लिहिलेले द अल्केमिस्ट जगभरातील घराघरात पोहोचले. त्यानंतर लाईक द फ्लोविंग रिवर, द जहीर, या एकापेक्षा एक सरस पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या या साहित्याच्या मैफिली तील आणखी एक सुरेल राग म्हणजे…. द फिफ्थ माऊंटन.

द अल्केमिस्ट नंतर यशाच्या शिखरावर विराजमान झालेला पाऊलो या पुस्तकामध्ये एलाईजा नावाच्या संताबद्दल लिहितो. मूळ बायबल मधील प्रॉफेट एलाईजा यांच्या कथेचा पुनर्जन्मच म्हणाना. बायबलमधील मूळ कथेला धक्का न लावता पाऊलो यांनी कथेला योग्य न्याय दिला आहे. म्हणजेच संगीत जुनं असलं तरी सूर मात्र नव्याने जुळले आहेत.

नवव्या शतकात फिनिशियन राजकुमार सर्व बिबलिकल संतांना मारण्याची आज्ञा करतो आणि एलायझा आपलं घरदार सोडून  परक्या भूमीत पलायन करतो. हरण्यासाठी काहीही उरले नसलेला एलायझा जगण्याचीही ही हिंमत गमावून बसतो मात्र केवळ त्याच्या देवाने त्याला केलेल्या मार्गदर्शनामुळे तो त्याचा प्रवास चालूच ठेवतो.आणि यातच त्याला अनपेक्षित मिळालेले त्याचे प्रेम हे म्हणजे वाळवंटातील प्रवाशाला मिळालेले थंडगार पाणी. येणाऱ्या प्रत्येक संकटाकचा वार सामुराई योध्या सारखा झेलणारा एलायझा आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचतो की नाही? एलाईज्याच्या आयुष्याच्या पोरक्या उन्हात गर्द झाडाची सावली कोण बनतो? हे प्रत्येकाने एकदा तरी वाचावेच असे आहे. कुठलीही गोष्ट करताना केवळ विश्वास ठेवा, अगदी स्वप्नवत वाटत असली तरी आत्मविश्वास आणि श्रद्धेच्या बळावर ती गोष्ट सत्यात उतरते,हाच संदेश या पुस्तकातून पाऊलोने आपल्याला दिलेला आहे.

प्रसिद्धी आणि यशाच्या लाटेवर विराजमान झालेल्या पाउलो मात्र अजूनही साधासुधा फकिरच. प्रसिद्धी आणि पैसा पायाशी लोळण घेत असला तरी त्याला आपला गावच जवळचा वाटतो. ब्राझीलच्या कोपा कबाना बीच त्याचा जीव की प्राण जणू “लाईक अ फ्लोविंग रिवर, ब्रीडा या सगळ्यांच्या पानापानातून त्याच्या ब्राझीलच्या आठवणी डोकावत राहतात. एकीकडे लिखाणाचा गुलमोहोर बहरला असताना पाऊलो तसा एकदम शांत आणि मितभाषी. प्रत्येक चांगला लेखक चांगलं भाषण करतोच असे असं नाही असं तो मिश्किलपणे सांगतो.

त्यामुळे आयुष्यात एकदा तरी नैराश्याच्या आजारचे शिकार झाला असाल तर “द फिफ्थ माउंटन” मधील तत्त्वज्ञानाच्या औषधाचा डोस घ्यायला हरकत नाही…

fifth mountain paulo coelho renuka salve


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/3430/the-fifth-mountain—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

रेणुका साळवे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *