zero to one marathi book review cover

झिरो टु वन

पोस्ट शेयर करा:

लेखक – पीटर थील, ब्लेक मास्टर्स

पृष्ठसंख्या – १९५

प्रकाशन – मधुश्री प्रकाशन

मुल्यांकन – ४. ५ | ५

“द्विमान पद्धतीमध्ये झिरो म्हणजे बंद आणि वन म्हणजे चालू” या एका तत्वावर आजच संपूर्ण संगणक क्षेत्र कार्यरत आहे. लेखक पीटर थील हे याच क्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. ते फेसबुक आणि पेपाल सारख्या दिग्गज कंपन्यांशी जोडलेले आहेत. पुस्तकाचं शीर्षक हे स्टार्टअप्ससाठी अगदी सूचक आहे कारण कारण पहिल्या तीन वर्षातच ९०-९५ टक्के स्टार्टअप्स बंद पडतात.

एक स्टार्टअप यशस्वी करण्याची गुरुकिल्ली या पुस्तकात आहे. प्रत्येक उद्योगासाठी तो एक क्षण महत्वाचा असतो जिथे त्यांना समजतं कि आपण नक्की काय करायला हवं. नवीन पिढीतील बिल गेट्स हे नवीन ऑपरेटिंग सिस्टिम बनवणार नाहीत, नवीन मार्क झुकेरबर्ग नवीन फेसबुक बनवणार नाही, नवीन लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन नवीन सर्च इंजिन बनवणार नाहीत. नवीन पिढीला नवीन प्रॉब्लेम्स सोडवणं गरजेचं आहे. तोच एक यशाचा खात्रीलायक मार्ग आहे.

जुनाट कल्पना घेऊन त्यांना नवीन रंगसंगोटी करून तेच तेच विकसित करण्यापेक्षा असं काहीतरी विकसित करा जे पूर्णतः नवीन आहे आणि ज्यात जग बदलण्याची ताकत आहे असं परखड मत लेखक या पुस्तकातून सांगू पाहतो.

पुस्तकात स्टार्टअप क्षेत्राचा इतिहास थोडक्यात दिला आहे आणि संगणक क्षेत्रातील काही महत्वपूर्ण घटना जस कि डॉट कॉम बस्ट आणि इतर काही घटना यांबद्दल विश्लेषण केलं आहे. पुस्तक तुम्हाला उद्यमी व्हायला, नवा विचार करायला प्रोत्साहित करेल. त्याच बरोबर ते तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.

लेखक पीटर थील याना स्टार्टअप क्षेत्राचा विस्तृत अनुभव आहे. ते जगभरातील सर्वोत्तम स्टार्टअप पैकी एकाला थील फेलोशिप सुद्धा देतात. एकंदर संगणक क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी हे पुस्तक वाचणं अनिर्वार्य आहे. तुम्ही उद्योगविश्वात काही मोठी कामगिरी करू इच्छित असाल किंवा विचारांना दिशा देऊ पाहत असाल तर हे पुस्तक नक्कीच वाचा.

zero one peter thiel blake masters akash jadhav madhushree


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/11482/zero-to-one—marathi—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *