aayushyache dhade giravtana marathi book cover

आयुष्याचे धडे गिरवताना

पोस्ट शेयर करा:

लेखक – सुधा मुर्ती

अनुवाद – लीना सोहोनी

पृष्ठसंख्या – २१२

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस

मुल्यांकन – ४.१ | ५

अमॅझॉनवरून विकत घ्या

आयुष्याचे धडे गिरवताना, हे पुस्तक २० हून अधिक लहान लहान गोष्टींचा एक रंजक आणि वळणदार स्त्रोत आहे. अगदी साधी, सोपी आणि सरळ भाषा. नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती या जेंव्हा इन्फोसिस फाऊंडेशन च्या मदतीने समाजासाठी काम करत होत्या, त्यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या लहानसहान घटना, त्यांना भेटलेली अनेक प्रकारची, विविध ढंगाची माणसं आणि त्यांचे स्वभाव, त्यातून निर्माण होणारे अनेक प्रसंग हे सर्व लेखिकेने अगदी उत्तम टिपले आहेत. मूळ इंग्रजी भाषेत असलेले ‘The day I stopped drinking milk’ या पुस्तकाचे लीना सोहोनी यांनी अगदी व्यवस्थित आणि साजेसा असा अनुवाद मराठीत करून मराठी साहित्यात भरच घातली आहे.

पुस्तकातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही देऊन जाते. काही मनाला हळवं करतात तर काही उस्फुर्त, काही खिन्न तर काही कुतुहलाने विचार करायला भाग पाडतात. गोष्टींना त्यांचे वेगळे अंग आहे. यातील अनेक गोष्टी आपल्याला जीवनाची जाणीव करून देतात. आपल्याही नकळत आपण आपल्या सोबत घडणाऱ्या घटनाशी त्याची जुळवाजुळव करतो, लोकांना पडताळतो आणि आपल्याला नाविन्याची कास मिळावी असे वाटायला लागते. हे या पुस्तकाचे सामर्थ्य किंवा गुपित आहे अस म्हणू. पण तरीही काहीतरी उणिव जानवते.

वाचाल तरी उत्तम आणि नाही वाचाल तरीही ठीक. लहानपणी आजीने सांगितलेल्या अनुभव कथा असाव्यात असच हे पुस्तक आहे. मला काही कथा मोहून गेल्या, पण काही तितक्याश्या भावल्या नाहीत. वाचून पहा. एक वेगळा अनुभव मिळू शकतो.

aayushyache dhade giravatana day stopped drinking milk sudha murti leena sohoni mehta

अमॅझॉनवरून विकत घ्या


संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *