लेखक – अमिश त्रिपाठी
पृष्ठसंख्या – ३७४
प्रकाशन – वेस्टलैंड पब्लिकेशन्स
मुल्यांकन – ४.५ | ५
प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या नावाजलेल्या रामचंद्र सिरीज मधले हे तिसरे पुस्तक, ज्यामध्ये त्यांनी रावणाबद्दल एक काल्पनिक प्रतिकृती मांडली आहे आणि त्यालाच या पुस्तकाचा नायक म्हणून एक त्याचे स्वरूप मांडले आहे. अमिश त्रपाठी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पौराणिक कथांचे काही दृश्य उभे राहतात, अलगद डोळ्यांभोवती तरळतात. त्या सार्या पौराणिक रोचक कथा एका विशिष्ट प्रकारे आणि वेगळ्या दृष्टीने मांडण्याचा त्यांचा हातखंडा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवा ट्रायोलॉजी ही सिरीज.
रामाच्या सीरिजमधील हे तिसरे पुस्तक असल्यामुळे याच्या आधीची दोन्ही पुस्तके वाचणे अगदी आवश्यक आहे. आणि त्यातूनच आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. हे तिन्हीही पुस्तके लेखकाने एका विशिष्ट प्रकारे गुंफले आहेत त्यातील गंमत त्यातील अर्थगर्भित आशयासहित आपल्याला पुस्तकात अडकवते.
ह्या पुस्तकातून आपल्याला रावण आपल्या आयुष्यात कसा वागला ?? आणि त्याच्या असं वागण्याच्या मागचे कारण काय ?? ह्याच उत्तर मिळत. कन्याकुमारी आणि रावणा मधला संवाद आपल्याला देखील विशिष्ट गोष्टींचा विचार करण्यास भाग पाडतील. धर्म आणि कर्म ह्यची आपली कल्पना आणि रावणाची कल्पना यात बरीच विसंगती आहे आणि हीच विसंगति आपल्याला राग, क्रोध, मत्सर यामधील बारीक अंतर शिकवून जाते.
ह्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आपल्या लहानपणापासून ऐकिवात असलेल्या कथांपासून काहीश्या वेगळ्या आहेत. या दोन गोष्टींमधील तफावत आपल्याला रावणाचा आणि रामाचा एक वेगळा दृष्टिकोन शिकवून जाते. त्यातूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांमुळे प्रत्येकाची दृष्टिकोन वेगवेगळे वाटू लागतात आणि आपणही त्यात गुंतून जातो. सहाजिकच आपल्याला एक नवीन लोलक मिळतो आणि त्यातूनच विचारांची परिपक्वता जाणवते. माझ्याप्रमाणेच तुम्हालाही हे पुस्तक खूप आवडेल आणि त्यातील बऱ्याच गुढ रहस्याची प्रचिती लवकरच येईल.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ