लेखक – जे.के. रोलिंग, जॉन टिफनी, जॅक थॉर्न
पृष्ठसंख्या – ३५२
मूल्यांकन – ४.५ । ५
९० च्या दशकातील मुलांसाठी हॅरी पॉटर हा जणू आपला जवळचा सखा सोबती. अगदी आज सुद्धा डेथली हॅलोज नंतर हॅरी पॉटर ची क्रेझ काही कमी झालेली नाही.
जे के रोलिंग यांनी अफाट कल्पना शक्तीतून निर्माण केलेल्या हॉगवर्टस् च्या दुनियेत सर्वकाही विसरून मन जणू रमून जाते. त्याच कुळातील सगळ्यात शेवटचे पुस्तक म्हणजे हॅरी पॉटर अँड द कर्स चाइल्ड.
….. वोल्डमॉर्टच्या मृत्यूनंतर कर्स चाइल्ड ची कथा एकोणीस वर्षानंतर सुरू होते. जादुई मंत्रालयात एका उच्चपदस्थ मंत्र्याचे काम करणारा त्याचप्रमाणे पूर्णतः आपल्या कुटुंब विश्वात रममाण झालेला हॅरी आपल्याला इथे दिसतो.
या पुस्तकातील कथा हॅरी आणि जिनी यांचा मुलगा अल्बस सेव्हरस पॉटर यांच्याभोवती फिरत राहते. टाइम ट्रॅव्हल करणारा अल्बस आणि त्याचा मित्र स्कॉर्पियस मॅलफॉय यांनी जो काही गोंधळ घालून ठेवला आहे तो हॅरी कशाप्रकारे निस्तरतो? वोल्डेमॉर्ट मेल्यानंतर सालाझार स्लीदरीन चा वंशज आहे तरी कोण? त्याचप्रमाणे सेड्रिक डीगोरी याचा अल्बसं शी संबंध काय? या सगळ्यांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतात.
पावलोपावली आपले वडील हॅरी पॉटर यांच्याशी होत असणारी तुलना अल्बसला असह्य होऊ लागते. मुळातच धाडसी असणारा अल्बस रागाच्या भरात काहीबाही निर्णय घेऊन बसतो. त्याच मुळे त्याला कर्झड चाइल्ड का म्हटलं आहे ते कळेल.त्याचप्रमाणे हॅरी पॉटर च्या पूर्वायुष्यातील बरेचसे खुलासे इथे होतात.
यातील रहस्य उलगडत असताना आपण स्वतः च पुस्तकात अडकत जातो, समजत नाही पुस्तक आहे की आपल्या सोबतच या घटना घडताहेत. अचानक विषय बदलणे त्यावरून नावा विषय गुंफने त्यातील काही बारीक गोष्टींना हळूच आणि हलकेच पुढे ढकलत त्याची एक मस्त सांगड घालून, या साऱ्यांच्या जोरावर पुस्तकाची मजा पुढे चालू ठेवणे. यामुळे जे. के. रोलिंग यांचे लिखाण नक्कीच मनमुराद आनंद देऊन जाते. त्यामुळे हॅरी पॉटरच्या चाहत्यांनी एकदा तरी वाचावं असं हे पुस्तक आहे.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ