atomic habits book review in marathi cover

एटॉमिक हॅबिट्स

पोस्ट शेयर करा:

लेखक – जेम्स क्लिअर
पृष्ठसंख्या – २६४
प्रकाशन – पेंग्विन रैडंम हाऊस
मुल्यांकन – ४.८ | ५

“मनुष्य सवयींचा गुलाम असतो” हे आपण बऱ्याचदा ऐकतो. हे अगदी खरं असलं तरीही या सवयींचा साखळदंड कसा मोडीत काढायचा हे आपल्याला माहित नाही. जेम्स क्लिअर लिखित “एटॉमिक हॅबिट्स” हे पुस्तक आपल्याला छोटे बदल करून मोठे परिणाम साधत तो साखळदंड कसा तोडायचा हे शिकवतं.

आता तुम्ही म्हणाल छोटे बदल घडवून काय फरक पडणार? पण लेखक पहिल्याच प्रकरणात आपल्यासमोर असं उदाहरण मांडतो जे वाचून आपल्याला छोट्या सवयी मोठे बदल घडवू शकतात याची जाणीव होते.

लेखकाने या पुस्तकात मांडलेला “रोज एक टक्का स्वतःमध्ये चांगले बदल” हा सिद्धांत जगप्रसिद्ध झाला आहे. माझ्या मते हा सिद्धांत प्रॅक्टिकल आहे आणि चक्रवाढ व्याजाप्रमाणे याचे फायदे वाढतच जाणारे आहेत. असे बरेचसे सिद्धांत यात आहेत. त्यापैकी मला आवडलेला – “तुमचं लक्ष्य प्राप्त करण्याकडे लक्ष देऊ नका, लक्ष प्राप्त करण्यासाठी एक पद्धत (सिस्टीम) बनवा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा”. जेम्स क्लिअर यांनी बराच काळ या पुस्तकाच्या रिसर्चमध्ये व्यतीत केला आहे. पुस्तक वैज्ञानिक तथ्यांवर आधारित असल्याने यात बरेचसे तक्ते, मांडण्या, फॉर्म्स आहेत. या पुस्तकाची वेबसाईट देखील आहे.

एखादी सवय कशी सोडायची याची प्रॅक्टिकल पद्धत देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन सवय कशी जोडायची हे हि सांगण्यात आलं आहे. पुस्तकाची मांडणी विचारपूर्वक करण्यात आली आहे. वैज्ञानिक गोष्टी भरपूर असूनदेखील पुस्तक सामान्य वाचकांना समजेल असंच आहे. शिवाय पुस्तकाला ऑनलाईन सपोर्ट देखील आहे.

विषय, मांडणी, प्रॅक्टिकल पद्धती, सोपी भाषा आणि विचार करायला भाग पडणारे सिद्धांत यामुळे हे पुस्तक “मास्टरपीस” (सर्व अर्थाने परिपूर्ण) आहे असं म्हणायला हरकत नाही.

atomic habits james clear akash jadhav penguin


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/14095/atomic-habits—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *