लेखक – जेम्स रेडफील्ड
पृष्ठसंख्या – २५७
प्रकाशन – ट्रांसवर्ल्ड डिजिटल
मूल्यांकन – ४ । ५
प्राचीन काळातील पौरात्य देशांमधील अध्यात्मिक विद्यांच्या ज्ञानाचे वारे फार जोरात वाहत नसले तरी, अध्यात्मिकता ही आताच्या काळाची गरज आहे. आणि हीच गरज ओळखून जेम्स यांनी लिहिलेले हे पुस्तक.
“रोंडा बर्न” यांच्या “द सीक्रेट” ने दिलेला आकर्षणाचा सिद्धांत किंवा द अल्केमिस्ट मधून पाउलो कोएलो यांना, वैश्विक शक्ती बद्दल जे सांगायचे आहे ते या पुस्तकातून अजून सखोल रित्या समजण्यास मदत होते. कथेतील मुख्य पात्र प्राचीन काळातील रहस्यमय अशा पुस्तकाचे नऊ खंड अमेरिकेतून पेरू या देशात घेऊन जाण्याचा जीवघेणा आटापिटा करतो. अगदी जगभरातील देशांच्या सरकारांनी ही पुस्तके सामान्यांच्या हाती पडू नये यासाठी कंबर का कसावी, असं या पुस्तकात आहे तरी काय ?? या सगळ्या प्रश्नांची उकल, रहस्यमयरित्या मुख्य पात्राला जशीजशी कथा पुढे जात राहते तशी तशी उकलते. कथेतील गुढ प्रश्नांची उत्तरे शोधताना अगदी शेरलॉक होम्स ची आठवण यावी असे पुस्तक. इतर वेळी काहीसे कंटाळवाणे वाटणारे आध्यात्मिकता आणि मनो विज्ञान यांचा दुर्गम संगम लेखकाने इतक्या मनोरंजक पद्धतीने रंगवला आहे की ही लेखकाची जादूच म्हणावी लागेल.
आपण आपली ऊर्जावलये कशी वाढवावी ?? त्याच प्रमाणे इतरांशी संभाषण करताना ऊर्जा वलयांचा वापर कसा करावा ?? या गोष्टी शिकताना अलिबाबाच्या गुहेतला खजिना हाती लागल्यासारखा वाटतो. आणि जेव्हा ह्या गोष्टी स्वतः करायला लागाल तेव्हा कळेल अरेच्या ” IT WORKS !!”
एकीकडे बुद्धीला चालना देणारी कथा म्हणून तिच्याकडे पाहतायेत आणि दुसरीकडे, योगायोग नावाची असली कुठली गोष्ट नसते आणि जे काही घडते त्याला नेहमीच काहीतरी कारण असते. त्याचप्रमाणे जीवनात मी आत्ता कुठे आणि भविष्यात कुठे असेल या प्रश्नांची उत्तरे शोधायला लेखकाच्या जादूमय पकडीतून शिकाल. त्यामुळे” द सीक्रेट”, “द हिरो”, “द मॅजिक”, “द अल्केमिस्ट” यांचे चाहते असाल तर हे पुस्तक लेखकाने खास तुमच्यासाठीच म्हणून लिहिलेले आहे. त्यामुळे नक्कीच वाचा… जेम्स रेड फिल्ड यांचे द सेलेस्टाईन प्रोफेसी..!!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ