लेखिका – टोनी मॉरिसन
पृष्ठसंख्या – ३५२
प्रकाशन – एव्हरीमॅन
मूल्यांकन – ४.७/ ५
पुलित्झर आणि नोबल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध लेखिका टोनी मॉरिसन यांनी 1927 साली जागतिक साहित्याच्या खजिना मध्ये एक मोलाची भर घातली ती म्हणजे त्यांनी लिहिलेली “बिलव्ह” ही कादंबरी.
“I wanted the reader to be kidnapped, thrown ruthlessly into an alien environment as the first step of shared experience with the books population”.
पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच असणार हे वाक्य म्हणजे पुस्तकाचा सार, परंतु ते सांगूनही पुस्तकातील पानागणित, लेखक हे का बोलला ते तुम्हाला आठवत राहील !! कादंबरीचा मुख्य विषय विषय म्हणजे एकोणीसाव्या शतकातील अमेरिकन मळ्या वाल्यांनी गुलाम म्हणून आणलेल्या कृष्णवर्णीय लोकांना दिलेली वागणूक. आजच्या काळात वाचत असताना देखील तुमचे रक्त त्या अन्यायामुळे सळसळणारच. ही कादंबरी वाचताना तुमच्या डोळ्यात अश्रू तरळले नाहीत, आणि “अरे माणसा माणसा कधी होशील माणूस तू “असा उद्गार तुमच्या तोंडून आला नाही तर शपथ !!
कथेतील मुख्य पात्र सेथी आणि तिचा जीवनपट म्हणजे हे पुस्तक. सेथीने स्वतःच आपल्या नवजात मुलीचे प्राण का घ्यावेत ?? त्या प्राणाची किंमत आईलाच माहित नसेल का ?? आणि त्या मुलीने समजा जाब विचारलाच, आणि ती विचारतेच. ते कसे याची केविलवाणी कथा अन् त्यावेळी तिच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना सेथीमधील आईची तळमळ आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपला निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल तिला होत असणारा पश्चातापही हृदयाला घरे पाडतो.
त्यावेळी अमेरिकेत झालेल्या गुलामगिरीची किती भयंकर परिस्थिती होते हे यात कळते. अगदी मानवतेला काळिमा फासणाऱ्या गोष्टी त्याकाळी घडल्या असल्या तरी मानव क्रूरतेची परिसीमा कुठपर्यंत गाठु शकतो हे वाचून डोकं सुन्न व्हायला होतं. अगदी जनावरापेक्षाही खालच्या थराच जगणं म्हणजे काय ते इथे समजतं. मधेच अश्रू, मधेच राग, मधेच द्वेष तरी पण मध्येमध्ये क्षणभंगुर आनंदाच्या तुषारांचा अनुभव घेत घेत वाचकाची गाडी कथेच्या शेवटच्या स्टेशनवर येते.
हे पुस्तक ठेवून दिले तरी कथा काही तुमची पाठ आयुष्यभर सोडणार नाही. वर्षानुवर्षे लक्षात राहणारी सेथी मधली आई, डेनवर आणि इतर पात्र तुम्हाला तुमच्यातल्या माणुसकीला जागं करायलाच लावतात. त्यामुळे विचार न करता आपल्या पुस्तकांचा खजिन्यात या कोळशाच्या खाणीतील हिऱ्याला सामावून घ्या… आणि संवेदनशील वाचक असाल तर बिनधास्त “Beloved” वाचायला घ्या.. आवडेल याची मी खात्री घेते.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: