natsamrat marathi book cover

नटसम्राट

पोस्ट शेयर करा:

लेखक – वी वा शिरवाडकर

पृष्ठसंख्या – ९२

प्रकाशन – पॉप्युलर पब्लिकेशन

मुल्यांकन – ४.८ | ५

सिनेमा महाराष्ट्रात मोठा होत असताना बराच मोठा काळ नाटकांनी गाजवला. यात मराठी जनतेचा कौल सुंदर कथालेखन, दिमाखदार पात्र आणि त्यांनी रंगवलेला तो नाट्य रंगमंच हे समीकरण अनेक वर्ष अगदी सहज आणि हुरारीने फोफावले. यात सर्वात मोठा आणि सिंहाचा वाटा म्हणजे त्यावेळी हे असे उच्च आणि गुंतवून ठेवणारे नाटकं लिहणारे लेखक. मग ते विजय तेंडुलकर असोत, कुसुमाग्रज असोत, पुल असोत. यांचा सहभाग मोलाचा. त्याच कालखंडातील ही एक कहाणी आहे. महाराष्ट्र हळू हळू विकासाकडे जात असताना, पाश्चिमात्य देशांमधील अनेक रूढींना कवटाळत असताना आपल्याच घराकडे होणाऱ्या दुर्लक्ष, घरातील बदललेले कौटुंबिक वातावरण आणि त्यातील नवनवीन समस्या.

अशातच निराशतेने आणि गृहकलहाला कंटाळून घरासाठी वणवण भटकंती करणाऱ्या, एके काळच्या नाटक क्षेत्र गाजवणाऱ्या आप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांच्या पत्नी यांचा हा जीवनपट आहे. आपला दिमाखदार आणि व्यक्तिरंजक स्वभाव आता सोशिक आणि गरीब होऊन सगळ काही निमूटपणे सहन करणारा होताना दिसत असताना आपण काहीच करु शकत नाही याची जाणीव मनाला सतत पोखरत असते. हे पुस्तक म्हणजे आपली सामान्य माणसाची कुटुंबपद्धती आणि त्यातील समस्या, मानवाच्या मनातली अनेक सुप्त गुण आणि अवगुण त्यातच हळू हळू आपण पैसे कमावणे किंवा स्वबळावर जगू शकत नाहीत याची खंत आणि आपण ज्यांच्यासाठी आपल्या आयुष्याचा मौलिक वेळ वाया घालवला त्यांच्याकडून होणारी हेटाळणी किंवा दुर्लक्ष यातून गुंफलेली एक विलक्षण आणि सामर्थ्यवान कथा आहे. जी गेल्या दोनतीन पिढ्या आपल्या समजाशी अगदी तंतोतंत जुळते आहे. त्याच प्रतिबिंब दर्शवते आहे.

पुस्तकातील लिखाण उच्च प्रतीचं आहे, शब्दांना किंमत आहे वजन आहे. प्रत्येक वक्तीची एक निराळी बाजू आहे स्वतःच मत आहे. आहे हे ठामपणे मांडणे हे लेखकाला नुसते जमलेच नाही तर त्यातूनच त्यांनी विश्व निर्माण करून एक बारीक नस पकडली आहे. म्हणून तर या पुस्तकाची, नाटकाची मराठी साहित्य क्षेत्रात आजूनही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे अस मला वाटत. यावर  मध्यंतरी एक सिनेमा आला होता आणि त्याने या पुस्तकाला अजुनच प्रसिद्धी मिळवून दिली आणि आताच्या काळातही दुर्दैवाने तीच परिस्थिती आहे हे लक्षात आणून दिलं.

पुस्तक जगण्यातील, नात्यातील, माणसामाणसातील, स्वकियांतील, परकियांतील, जवनितील आणि म्हातारपणातील देखील अनेक बारीक सारीक बाबी उलगडून जातो. एक रेशीम धागा विणताना होणारे सुख आणि आनंद आणि तोच धागा हळू हळू उलगडू लागल्यावर होणारी कासावीस आणि सल लेखकाने अचूक टिपली आहे.

साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब कस असते हे पाहायचं असेल आणि थरारक अनुभव बघायचा असेल त्यासाठीच लिहल आहे हे पुस्तक अस मला वाटते. वाचून तुम्हीही चकित व्हाल.

natsamrat shirvadkar kusumagraj popular akshay gudhate drama


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/4327/natasamrat—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *