vat-tudavtana-marathi-book-review-cover

वाट तुडवताना

पोस्ट शेयर करा:

लेखक – उत्तम कांबळे

प्रकाशन  – मनोविकास प्रकाशन

मूल्यांकन – ३.७ । ५

समीक्षण – सुचिता पाटील

उत्तम  कांबळे… ‘सकाळ’ चे मुख्य संपादक, सकाळ च्या पुरवणीतले ‘फिरस्ती’ चे  लेखन तर सगळ्यांनीच वाचलंय. त्यांच्या लेखनाचे वेगळेपण वेळोवेळी त्यांच्या लेखांमधून समजून येत. आत्मकथन म्हणजे भूतकाळातील कृती नव्याने अनुभवायला मिळते. उदाहरणार्थ, सात -पिढ्यांमध्ये  कोणी शाळेची पायरी न चढलेल्या घरातील हा  मुलगा  म्हणतो – ‘मी रोज एक पाटी शेण गोळा करतो, मग देशील पुस्तक?’ आई म्हणते, ‘आरं शेणकुट्याचं पैसं पुस्तकावर उधळलास तर खाशील काय?’ या दोन प्रश्नच्यासोबत वाढणारं हे मन आहे… या प्रश्नांमधल्या दोन भुकांनी त्याला काय काय करायला लावलं नाही. जळणासाठी उकिरडे शोधायला लावले, चिखल वाहायला लावले, डिंक गोळा करायला लावला, हमाली करायला लावली, आतडी जाळण्यासाठी भुतांचा नैवेद्य खायला लावला, पाणी पिऊन भूकेवर मारा करायला लावलं..  पेपरचे गठ्ठे बांधून बसमध्ये टाकण्यापासून ते बुक बाईंडिंग करण्यापर्यंत, सायकल पंक्चर ते कंपाउंडर म्हणून काम करावं लागलं आणि ‘भाकरी युगाचा शाप ‘ कशी बनली आणि भाकरी ने त्यांना पुस्तकांपासून दूर ठेवलं… आणि जस म्हणतात ना – ‘एक भूक दुसऱ्या भुकेची भूक वाढवते; या न्यायाने त्यांची वाचनाची वाढत जाणारी भूक.

खरंतर माणूस आणि जीवन यांच्या आंतरसंबंधातून निर्माण होणार वास्तव, सततच असमान आणि अपूर्ण राहिलेले आहे. त्यांच्यामधली  गुंतागुंत शोधक दृष्टीला नेहमीच आव्हान देत असते. आपण एका मर्यादित क्षेत्रात काम करत असताना तो एक वास्तवाचा तुकडा असतो पण तो स्वतंत्र नसतो हे हि तितकेच खरे असते. पत्रिकारितेच क्षेत्र त्यातीलच एक.  कारण पत्रकारितेच्या केंद्राशी माणूस आणि जीवनवास्तव यांचे आतंरसंबंध खूप महत्वाचे मानले जातात.. पत्रकाराचे शब्द जेव्हा समाज हलवतात, समाजातील माणुसकी जागी करतात तेव्हा होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येणारा नसतो हे हि तितकंच खरं. यामध्ये एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने घेतलेल्या धक्कादायक वळणाचे चित्रण आहे, त्यावेळी त्या मुलीचं दुःख जस गुंतलं होत त्या बातमीत तसेच लेखकाचं भविष्य देखील त्यात तितकंच गुंतलं होता. कारण कोणता घटक कितपत प्रभावी होता हे  येणार नव्हतं. हे यासाठी महत्वाचं वाटत कारण त्यात ‘स्व’ ला ओळखण्याची क्रिया आहे. हे भान व बाह्य वास्तव याच्या आंतरिक प्रक्रियेचा भाग आहेत.

काही माणसे जातीकडून जातीकडे आणि काही काही जातीकडून माणसाकडे जातात. जीवनाला संवादी ठेवण्यासाठी, तो संवाद विकसित करण्यासाठी शब्दांची गरज असते ,आणि शब्दांसाठी पुस्तकांची. दारिद्र्यामुळे बसलेले चटके, झालेल्या जखमा वाचनात विसरून त्यातील संस्कार स्वीकारत, स्वतःला सक्षम बनवणारा लेखक आपल्याला दिसतो. अशी हि ‘वाट तुडवताना ‘ लेखक म्हणतो – पृथ्वीच्या पाठीवर निसर्ग कोणत्याही जीवासाठी स्वतः वाट तयार करत नसतो.ज्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असत ,चालायचं असतं प्रवास करायचा असतो त्यानं च आपल्याला हव्या असण्याऱ्या वाटेसाठी पहिल पाऊल  उचलायचं  असतं . ते पहिलं पाऊल म्हणजे त्याच्या वाटेचा प्रारंभबिंदू असतो.जो पाऊल न उचलता जागच्या जागी थांबतो त्याच्यासाठी वाट तयारच नाही होता. मग तो उसनवारी दुसऱ्याची वाट घेतो नि तो जेथे पोहचला तेथेच जाऊन थांबतो. दुसऱ्याच्या वाटेवरून चालत आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोहचता येत नाही , त्यासाठी स्वतःची वाट स्वतःच तयार करावी लागते..                              

‘अत दीप भव’ म्हणजे स्वतःच प्रकाशमान हो , स्वतःच उजेड हो आणि स्वतःच स्वतःची वाट हो . (बुद्ध) अशा तऱ्हेने रुळलेल्या वाटेपेक्षा नव्या वाटेवर धोके, अडथळे अधिक असतात. 

अशी हि लेखकाने पकडलेली वाट आज त्यांना संपादकापर्यंत घेऊन आली.

समीक्षण – सुचिता पाटील

vat tudavtana uttam kamble manovikas suchita patil


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/832/wat-tudavatana-uttam-kamble-manovikas-prakashan–buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *