लेखक – रँडी कर्क
अनुवाद – सुनीति काणे
समीक्षक – कुणाल घोडेकर
प्रकाशन – साकेत प्रकाशन
मुल्याकंन – ३ । ५
काही लेखक सर्वोत्कृष्ट लेखन करण्यासाठी ओळखले जातात तर काही लेखक सर्वात जास्त पुस्तक विक्री साठी(बेस्ट सेलर्स).
साहजिकच जास्त पुस्तक विक्री म्हणजे जास्त नफा आणि त्यात काहीच वावगं नाही. पण विक्री ध्येय गाठण्यासाठी नैतिकता पाळणे देखील तितकंच महत्वाच असत. लोकांची दिशाभूल न करणे हि एक नैतिकता आहे. इंटरनेटवर ब्लॉग यशस्वी करण्याचा हमखास मार्ग म्हणजे आधीच प्रकाश झोतात असलेल्या व्यक्ती, संस्था, उत्पादनं किंवा सर्व्हिसेस बद्दल लिहीन किंवा त्यांचं समीक्षण करणं.
२०२१ च्या सुरुवातीलाच एलॉन मस्कच नाव जगभर चर्चेचा विषय बनलं. कारण सुद्धा तसंच होत, एलॉन मस्कने धनाढ्य जेफ बेजोस (अमॅझॉन चे संस्थापक) यांना मागे टाकत जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा किताब पटकावला. तस बघायला गेल तर एलॉन या ना त्या कारणाने सतत प्रकाशझोतात असायचाच.
टेस्ला, स्पेसएक्स, सोलारसिटी अशा विविध कंपन्यांचा मालक आणि त्याची अद्भुत अशी भव्यदिव्य स्वप्न वाचून एलॉन बद्दल आणखी जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. त्यातच हे पुस्तक हाती आलं. बहुधा एलॉन मस्कवर आधारित हे मराठीतील पाहिलं पुस्तक असावं.
“द एलोन मस्क मेथड्स” या मूळ पुस्तकाचा अनुवाद म्हणजे “एलॉन मस्क” हे पुस्तक. गमतीचा भाग म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कुठेच मूळ पुस्तकांच नाव नमूद करण्यात आलेलं नाही. आणि मूळ पुस्तकाच्या नावातील “मेथड्स” हा शब्द मराठी आवृत्ती मधून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ होणार हे नक्की.
“एलॉन मस्क” हे पुस्तक एलोनच ना चरित्र आहे ना आत्मचरित्र. पुस्तकाच्या सुरुवातीला एलॉन मस्क बद्दल संक्षिप्त स्वरूपात लिहिलं आहे आणि पुढे त्याचे काही कृष्ण-धवल फोटोस सुद्धा दिले आहेत. लेखकाने एलॉन मस्क ला समोर करून बिजनेस कसा करावा? कसा वाढवावा? या सारख्या विषयांवर १६ कार्यपद्धती दिल्या आहेत. या कार्यपद्धतींमध्ये एलॉनचे काही वाक्य (लेखकाने न घेतलेल्या मुलाखतीतील; कारण लेखक आणि एलोन ची भेट अजूनतरी झालेली नाहीये) त्याने केलेल्या काही कृती जोडल्या आहेत.
या कार्यपद्धती नक्कीच उत्तम आहेत. लेखक स्वतः उद्योजक असल्याने त्यांचा अनुभव देखील या कार्यपद्धतीत अधूनमधून हळूच डोकावतो. मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. एकूणच जर तुम्हाला व्यवसायाबद्दल वाचायचं असेल किंवा ज्ञान वाढवायचं असेल तरच या पुस्तकाबद्दल विचार करा, एलॉन मस्क बद्दल वाचायचं असेल तर नक्कीच नाही.
समीक्षक – कुणाल घोडेकर
अमॅझॉनवरून विकत घ्या
संबंधित व्हिडिओ