tin hajar take marathi book review cover

तीन हजार टाके

पोस्ट शेयर करा:

लेखिका –  सुधा मूर्ती

अनुवाद –  लीना सोहोनी

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठ संख्या – १५२

मुल्यांकन – ४.५ | ५

समीक्षण – नंदिता शेवाळकर

सुधा मूर्ती हे नाव आपण अनेकदा ऐकले असेल. लिखाणात साधेपणा आणि त्यातून सामान्य लोकांसाठी एक असमान्य विचार मांडण्यासाठी केलेली धडपड आपल्याला माहीत आहे. यामुळेच मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि वाचताना अजूनच प्रेरित झाले. त्याची कारणही तशीच आहेत. आपल्या अनुभवातून आपल्याला शिकवण तर मिळतेच पण तीच शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

लेखिकेने ‘इन्फोसिस फाउंडेशन’ च्या माध्यमातून काम करत असताना, समाजातील विविध प्रकारच्या घटकांसोबत त्यांचा परिचय आला होता. त्याचवेळी समाजातल्या दुर्लक्षित घटकांच्या आयुष्याबद्दल तसेच त्यांना येणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी, त्यांचा संघर्ष, त्यांना होणाऱ्या वेदना या कथासंग्रहामधून सुधा मूर्ती यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांत मांडले आहे. तीन हजार टाके या पुस्तकांमधून मानवी स्वभावाच्या दोन्ही बाजूंचा म्हणजेच सौंदर्य आणि घृणा यांचा उल्लेख केला आहे. या कथा संग्रहातील प्रत्येक कथा ही सत्यकथा आहे. माणसांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या यशाच्या वाटा याचे अत्यंत मार्मिक चित्रण केले आहे. यात एकूण ११ कथा आहेत.

या कथांमधून आयुष्य सन्मानाने कसे जगता येते, हे सांगितले आहे. बऱ्याच वेळा आपण हिंमत आणि धैर्य दाखवून केलेली छोट्यातली छोटी गोष्ट देखील इतरांसाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी होते. लेखिकेने केलेला दूरदूरचा प्रवास त्याचबरोबर त्यांना स्वतःला आलेले अनुभव, या कथासंग्रहातून आपल्यापुढे मांडले आहेत. याचा आपल्या आयुष्यातही फायदा होतो. आपणही सामान्य माणसाच्या नजरेतून नवीन गोष्ट पाहतो आणि विचार करायला लागतो. विचारांची सजावट आणि त्यातून मिळणारा बोध ही या पुस्तकाची जमेची बाजु आहे.

देवदासी समाजासाठी केलेले, काम त्याची माहिती त्यात आलेल्या अडचणी तसेच बॉलिवूड चित्रपटांच्या बाबतीत परदेशात आलेले अनुभव. आपल्या वडिलांचा प्रेमळ स्वभाव, भारतीय भाज्यांचे मूळ स्थान आणि इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शेकडो मुलांमध्ये एकुलती एक मुलगी म्हणून शिकत असताना आलेल्या अडचणी ह्या विषयी कथन केले आहे. अगदी सोप्या भाषेत त्यांनी सामान्य माणसांच्या आयुष्यातले असामान्य अनुभव आपल्या पर्यंत पोहचवले आहे.

समीक्षण – नंदिता शेवाळकर

tin hajar take leena sohoni nandita shewalkar mehta sudha murthy


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/6878/teen-hajar-take-sudha-murty-mehta-publishing-house-buy-marathi-books-online-at-majesticreaders-9789387319936″]संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *