elon-musk-ashlee-vance-marathi-book-review-cover

एलोन मस्क: टेस्ला, स्पेसएक्स अँड क्वेस्ट फॉर अ फँटॅस्टिक फ्युचर

पोस्ट शेयर करा:

लेखक –  ऍशली व्हॅन्स

प्रकाशन – एको / वर्जिन बुक्स / पेंगूइन रँडम हाऊस

पृष्ठसंख्या – ४१६

मूल्यांकन – ४.५ । ५

पृथ्वीवरील सर्वात व्यस्त कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी एक एलोन मस्क, हे एकाचवेळी अनेक कंपन्यांचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. या कंपन्या साधारण नसून त्या मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे व्यवस्थापन करताना येणाऱ्या अडचणी यापूर्वी कोणीच सोडवल्या नाहीत असं आपण म्हणू शकतो. कदाचित त्यामुळेच एलोन मस्क या व्यक्तिमत्वा भोवती एक वलय निर्माण झालय. एलोन मस्क ला रिअल लाईफ आयरन मॅन म्हटलं जात. त्याच्या एका ट्विट मुळे जगभरात (विशेषतः क्रिप्टो बाजारात) कोट्यवधींची हालचाल होऊ शकते. इलेक्ट्रिक कार संकल्पना पुन्हा लोकप्रिय करणारा आणि मानवाला अंतरग्रहीय प्रजात बनविण्याच्या स्वप्नाने भारावलेला हा अब्जाधीश अनेक अर्थांनी वेगळा आहे.

एलोन मस्क यांचं चरित्र लिहिणे म्हणजे महाकठीण काम पण हे शिवधनुष्य ऍशली व्हॅन्स यांनी समर्थपणे हाताळलं आहे. सुरुवातील ऍशली व्हॅन्स यांनी जेव्हा एलोन मस्कला चरित्र लिहिण्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने हा प्रस्ताव सपशेल उडवून लावला. पण ऍशली व्हॅन्स यांनी घोषित केलं कि तो एलोन च चरित्र लिहिणारच मग त्याला त्याची परवानगी असो अथवा नसो. एलोनला जिद्दी लोक फार आवडतात, ऍशली व्हॅन्स यांची जिद्द बघून त्याने चरित्र लिहिण्यासाठी परवानगी दिली आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलाखतींची सोय देखील करून दिली.         

एलोन च बालपण, त्याचं अमेरिकेत स्थायिक होण्याचे खटाटोप, त्याने सुरु केलेल्या सर्व कंपन्यांबद्दल, त्याच्या वयक्तिक जीवनाबद्दल, सांसारिक जीवनाबद्दल आणि त्याच्या स्वप्नाबद्दल तुम्हाला या पुस्तकात भरभरून वाचायला मिळेल. आज एलोन मस्क जगातील अतिश्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे पण एका दशकापूर्वी स्थिती काही वेगळी होती. टेस्ला कंपनीला टाळे लावण्यासाठी फक्त काही आठवडे बाकी होते त्या परिस्थितीतून टेस्लाला आज लोकप्रियतेच्या शिखरावावर नेण्याचं काम एलोन ने केलं आहे. मानवाला आंतरग्रहीय जमात बनविण्याचं स्वप्न त्याच्या बालपणातच रुजलं गेलं. एलोनला वाचनाची प्रचंड आवड.  त्याने स्पेसएक्ससाठी रॉकेट विज्ञानाच ज्ञान , पुस्तके वाचून जमा केलं. एलोनने केलेल्या चुका आणि त्यावर त्याने कशी मात केली याबद्दल तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल.     

पुस्तक वाचताना एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे एलोनसाठी “अशक्य” हा शब्द अस्तिवातच नाही. जर एखादा कामगार त्याच्याकडे “हे साध्य करणे शक्य नाही.” असे बोलला तर त्याला कामावरून कायमची सुट्टी मिळण्याची शक्यता असते. स्पेसएक्स प्रकरण वाचताना तुमच्या वैचारिक कक्षा रुंदावणार यात काही शंका नाही. हे प्रकरण इतकं प्रभावी आहे कि तुम्ही देखील  “अशक्य” हा शब्द विसरून जाल. कारण   एलोन मस्क, स्पेसएक्सचे कामगार यांनी अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी जी धडपड आणि मेहनत घेतली आहे ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. एलोन आजही ८० ते १०० तास काम प्रत्येक आठवड्याला करतो आणि तो त्याच्या कामगारांपासून सुद्धा तीच अपेक्षा ठेवतो.

एलोनला जगात सगळीकडे मानवजातीचा हिरो म्हणून ओळख प्राप्त झाली असली तरीही त्याच्या स्वभावात सर्वसामान्यांना खटकतील अश्या काही गोष्टी आहेत. लेखकाने या गोष्टीबद्दल उघडपणे लिहिलं आहे. लोकांना कामावरून काढण्या बद्दल आणि ८०-१०० तास काम या अवाजवी अपेक्षांबद्दल देखील लेखकाने लक्ष वेधलं आहे. एलोनच्या आयुष्यातील काही निवडक रंगीत फोटो देखील या पुस्तकात देण्यात आले आहेत. एकूणच हे चरित्र तुम्हाला पहिल्या शब्दापासून खिळवून ठेवतं. अशक्यप्राय गोष्टी हि शक्य आहेत हे समजून घेण्याकरिता हे पुस्तक सर्वांनी एकदा नक्कीच वाचायला हवं.          

elon musk ashlee vance virgin penguin ecco akash jadhav


हे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/9756/elon-musk—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *