mounanchi-bhashantare-marathi-book-review-cover

मौनाची भाषांतरे

पोस्ट शेयर करा:

काव्य संग्रह : मौनाची भाषांतरे

कवी – संदीप खरे

प्रकाशन – काँटिनेंटल प्रकाशन

पृष्ठसंख्या – १५२

मुल्यांकन – ४.६ | ५

संवेदना म्हटलं की अनेक गोष्टी आल्याचं. त्या कशा माणसाला आयुष्यभर वेगवेगळया प्रकारे भेटतात. काहींच्या बाबतीत आता त्या बोथटही झाल्या असतील… काहींना त्या आवारात नाहीत… आणि काही जणांच्या संवेदनाच त्यांची उस्फुर्त ताकत असते. संदीप खरे हे नाव ऐकलं तरी मला एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे, सामान्य माणसाच्या आयुष्यातील संवेदनशील गोष्टी, आपल्या निर्भिड आणि लोभस शब्दातून लोकांसमोर मांडणारा एक हळवा कवी.

आपल्या कविता त्यांनी “आयुष्यावर बोलू काही” लोकांसमोर आणल्या आणि सगळ्यांना त्या स्वतःच्या वाटू लागल्या. प्रत्येक कवितेशी आपलं नातं असल्यासारखं वाटू लागलं. नवीन पिठीच्या ओठांवर पुन्हा कविता रुळू लागल्या. “मौनाची भाषांतरे” हा त्यांचा काव्यसंग्रह सर्वपरिचितच आहे. त्यातील बहुतांश कविता देखिल अनेकांना तोंडपाठ आहेत. या काव्यसंग्रहात नावाप्रमाणेच मनात आलेल्या किंवा आपल्या आपल्याशीच असणाऱ्या अनेक गोष्टी इथे कवितांमधून मदल्या आहेत. यात सर्व विषयांवर कविता आहे. मुक्त आहेत वृत्तात आहे. वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख करणारा हा काव्यसंग्रह आहे.

सगळ्यांनी नक्की वाचव्या अशा अनेक कविता यात आहेत. यातली एक एक कविता मनात साचनरे आणि पुढ्यात दिसणारे आपल्याला किती भेडसावत आहे पण आपण बोलू शकत नाही यासाठी आहे. संग्रहाचे नावामधील मौन हे नक्की कोणाचं मौन आहे हे मला आता समजत नाहीये. सुरवातीला पुस्तक हातात आल तेंव्हा वाटलं हे स्वतःच मौन आहे. पण आता कविता वाचून संभ्रम वाढत आहे. हे समाजाच मौन कवीने आपल्या लेखणीतून उतरवलय अस वाटतं आहे. नक्की वाचाचं हे पुस्तक. हा संग्रह तुम्हाला अजून समृद्ध करेल. विचापूर्वक एक मत निर्माण करेल.

स्वप्न, नास्तिक, मांजर य माझ्या काही आवडत्या कविता आणि त्यातली सगळ्यात जास्ती आवडीची कविता मी खाली लिहीत आहे. ही कविता मला सगळीच कवींची एक बाजू मांडते अस वाटतं.

“कवीचे आयुष्य

कवीचे आयुष्य सोपे असते यासाठी

की केवळ एक जरी अस्सल कविता लिहिली

तरी मरायची मुभा असते त्याला!

कवीचे आयुष्य अवघड असते यासाठी

की शेवटच्या श्वासापर्यंत

असे काही लिहिल्याची खात्री नसते त्याला!!”

maunanchi bhashantare sandip khare continental akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/3119/maunachi-bhashantare-sandip-khare-continental-prakashan-buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *