parv-marathi-book-review-cover

पर्व

पोस्ट शेयर करा:

लेखक – डॉ एस. एल. भैरप्पा

अनुवाद – उमा कुलकर्णी

समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस

पृष्ठसंख्या – ७९२

मुल्यांकन – ३.७ | ५

महाभारत म्हटलं की आपल्या समोर उभी राहतात अनेक पात्र, अनेक बाजू, अनेक कथा, अनेक विचार आणि यातूनच एक चित्र उभा राहतं आपल्यासमोर. काहींना कर्ण आठवेल तर काहींना कृष्ण, काहींना द्रौपदी तर काहींना गांधारी आणि या सगळ्यांची आपल्या मनात उभी राहिलेली एक प्रतिमा. पण या प्रतिमेत आपण आधीच काही पात्रांना छान म्हणून मोकळे झालो आहोत आणि काहींना वाईट. पण या पुस्तकाची खासियत म्हणजे हे पुस्तक तुम्हाला अनेकांच्या नजरेतून पाहायला मिळते. या पुस्तकात सर्वांनाच माणूस म्हणून पाहिलं आहे आणि आपसूकच त्यातून त्यांच्या कडून होणाऱ्या चुका त्यांची कल्पना त्यांनी केलेले काम आणि त्या मागची एक विचारधारा आपल्याला समजते.

माझा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे महाभारत. म्हणून मी जेंव्हा हे पुस्तक पाहिलं तेंव्हाच वाचायची खूप इच्छा झाली. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वयोवृद्ध भीष्म, रथात उभा कृष्ण आणि काहीतरी विचार करत असणाऱ्या द्रौपदीचा चेहरा आहे. यामुळेच पुस्तकं कधी हातात घेतो अस झालं आणि हे पुस्तक मी आठवड्यातच वाचूनही काढलं. या पुस्तकांत फक्त शेवटचे युद्ध आणि त्या आधीची काही परिस्थीती मंडळी आहे. त्यातूनच त्यांच्या जुन्या आठवणी एकत्र करून कथा तडीस नेले आहे. सुरवातीच्या ४०० पाने अगदींच उत्साहाची वाटतात. प्रत्येकाच्या नजरेतून त्याच गोष्टी पुन्हा पाहताना मजा येते. पण पुन्हा मात्र याच बाबींचा कंटाळा येतो. मला स्वतःला शेवटची २०० पाने या कारणाने रटाळ वाटली. पण संपुर्ण पुस्तक बघता यातून खूप काही समजू शकत, नवीन दृशिकोन मिळतो.

या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे, यात लेखकाने मांडलेली गोष्ट. ती गोष्ट ज्या प्रकारे वेगवेगळया पात्रांच्या करवी पुढे जाते. त्यात कोणीही देव नाही, सगळे माणूस म्हणून गुंफताना कोठेही मुल गाभ्याला धक्का लागत नाही. आपल्याला अनेक गोष्टी पटतात. जर खरेच महाभारत झाले असेल आणि खटलरेच ती देव नसून ती फक्त साधी माणसं असती तर कसे झाले असते. यासाठी हे पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचू शकता.

प्रेम, वासना, मनाची गुरफट यातून या कादंबरीला एक वेगळीच दिशा मिळते. काही लोक या बाबत सहमत नसतील. त्यामुळे पुस्तक कदाचित आवडणारही नाही. परंतु याला फक्त एक कादंबरी म्हणून पाहीलं तर नक्कीच तुम्हाला ही खुप आवडू शकते. परंतु महाभारताचा अभ्यास किंवा त्यातील बारकावे यातून लक्ष्यात येणार नाहीत. ही कादंबरी वाच्ण्या अगोदर. तुम्हाला महाभारता विषयी थोडी महिती हवी. मी ही कादंबरी दोन वेळा वाचली दोन्ही वेळेस काहीतरी नवीन हाती लागले. तुम्ही देखील वाचून नक्की कळवा, तुम्हाला कशी वाटली!

sl bhyrappa akshay gudhate mehta uma kulkari


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/1399/parv—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *