inside-marathi-books-harvlelya-vata-marathi-book-review-cover

हरवलेल्या वाटा

पोस्ट शेयर करा:

लेखिका – माधवी देसाई
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस
पृष्ठसंख्या – ११६
मुल्यांकन – ४.१ | ५

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक वाटा असतात. त्यातील आपल्याला कोणती आवडते, कोणती आवडत नाही, आणि त्यातील आपण कोणती निवडतो यावरून आपल्या आयुष्याला आकार येतो रंग येतो. आपल्या आशा, अपेक्षा असतात. प्रत्येकाची काही इच्छा असते. सर्व त्याच प्रकारे होईल अशी काही ग्वाही देता येत नाही. आणि झालं तरीही आनंद होईलच हेही सांगू सहत नाही. यामुळेच आपल्याला निवडलेल्या वाटा पुन्हा पडताळून पहव्या वाटतात. आणि आयुष्यातील “हरवलेल्या वाटा” पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या ठाकतात.

माधवी देसाई लिखित हरवलेल्या वाटा ही अशीच एक काल्पनिक कादंबरी, परंतू कथेच्या स्वरूपाने माणसाच्या आयष्यातील अनेक रंग, त्याच्या मनाचे अनेक पदर अगदी सहजतेने आणि लघवी भाषेने त्यांनी आपल्या समोर उलघडून दाखवले आहेत. दोन अगदी वेगळ्या प्रकारच्या माणसांच्या आयुष्याची एकत्रित गुंफलेली ही गोष्ट. विजय राज्याध्यक्ष.. आणि तेजस्विनी मेहंदळे.

विजय.. पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त, आताचा एक नावाजलेला उत्तम वकील.. लहानपणी सावत्र आई मुळे त्रासून रत्नागिरीस मामाकडे आलेला, त्यातच आयुष्यात आलेली आणि मनाविरुद्ध लग्न झालेली रेणू आणि मुलगा राजू. शिक्षण घेत असताना प्रेम बसलेली आभा आणि या साऱ्या नात्यांमधील लहान लहान धागे दोरे. तर याउलट तेजस्विनी.. हळवी, पदवीधर, आणि अतिशय कुशल आणि हुशार डॉक्टर. नवरा प्रशांत आणि मुलगी आशू. अस्तित्व नाकारलेल्या घरात स्वतःला प्रामाणिकपणे वाट शोधणारी. वाटेत महेंद्र आणि विजय सारखे मित्र मिळाल्याने आता तिच्या आयुष्यात येणार विचारांचं वादळ, माधवी देसाई यांनी खूप सुरेख शब्दात मांडलं आहे. त्यावर अनेक भावनांचा विचार आणि रोजच्या गोष्टींचे होणारे पडसाद मांडण्यात त्यांना यश आल आहे.

आपली खरी वाट कोणती? रोजची भूल देणारी वाट निवडावी? की ज्यावरून इतके दिवस रोज प्रवास करत आहोत त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता धुकट वाटणारी वाट आपली? असे अनेक प्रश्न.. अनेक विचार.. या पुस्तकाला एक वैचारिक आणि सामाजिक भान देणार पुस्तक बनवतं. पुस्तकातील भावनाप्रधान वर्णन, भाषा, आणि त्याच सोबत नात्यातील नाजूक रेघ सुंदर प्रकारे जपल्यामुळे हे पुस्तक अजुनच खुलले आहे. आपल्या आयुष्यातील पैसा, प्रतिष्ठा, मान, अपमान, प्रेम, द्वेष या साऱ्याच काही प्रमाणात किती फोल गोष्टी आहेत. मानसिक शांती, सर्वात जवळच्या माणसाचा विश्वास आणि आपुलकी यावर किती गोष्टी अवलंबून असतात हे यातून समजले. सहजीवनात महत्त्व कशाचे आहे, हाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे असे मला वाटते. मला हे पुस्तक खुप आवडलं, तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा!

haravlelya vata madhavi desai akshay gudhate mehta


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]




संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *