inside-marathi-books-how-to-avoid-a-climate-disaster-book-review-in-marathi

हाऊ टू अव्हॉइड अ क्लायमेट डिसास्टर

पोस्ट शेयर करा:

लेखक – बिल गेट्स 

प्रकाशन – एलेन लेन 

पृष्ठसंख्या – २७२

मूल्यांकन – ४.६ । ५

क्लायमेट चेंज किंवा जागतिक तापमान वाढ हा फक्त निबंध लिहिण्यासाठीचा विषय नसून मानवजातीसमोर उभं असलेलं मोठ संकट आहे. औद्योगिक क्रांतीमुळे आतापर्यंत जागतिक तापमानात १.५ डिग्री सेलसिअस च्या जवळपास वाढ झाली आहे. ज्याचे परिणाम वातावरण बदलातून आपण सर्व जण अनुभवत आहोत. जागतिक तापमान वाढीचा फटका सर्व देशांना कमी अधिक स्वरूपात सध्या बसला आहे. २१०० पर्यंत जागतिक तापमानात ३ डिग्री सेलसिअसची वाढ होणार आहे. ३ डिग्री म्हणजे खूप कमी असं जरी वाटत असेल तर जागतिक पातळीवर हि वाढ धोकादायक ठरू शकते. मानवजातीने एकत्र येऊन जरी या समस्येला तोंड दिल तरी २१०० पर्यंत २ ते २. ५ डिग्री सेलसिअसची वाढ होणे अटळ आहे. उज्ज्वल भविष्यासाठी, विकासाठी आणि पुढील पिढीसाठी या समस्येवर सर्व देशांनी एकत्रित येऊन उपाययोजना करणे आवश्यक आहेत त्यामुळेच बिल गेट्स लिखित “हाऊ टू अव्हॉइड अ क्लायमेट डिसास्टर” हे पुस्तक आजमितीस सर्वात महत्वाच्या पुस्तकांपैकी एक आहे. 

क्लायमेट चेंज बद्दल बिल गेट्स यांचा १० वर्षाहून अधिकचा अभ्यास, शेकडो शास्त्रज्ञाच्या भेटी, तंत्रज्ञानाची सखोल माहिती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यामुळे  सहज शक्य असलेल्या गोष्टी यामुळे हे पुस्तक एक अभ्यासपूर्ण, समजायला सोपं तरीही सखोल माहिती देणारं ठरतं. पुस्तकातील सुरुवातीची प्रकरणं वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरित वायू कशाप्रकारे उत्सर्जित होतात या बद्दल आहेत. जागतिक तापमान वाढीत सर्वात जास्त योगदान वाहनांचे  नसून ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पुस्तकातील शेवटची प्रकरणे जागतिक पातळीवर कोणत्या प्रकारची धोरणे राबवणे आवश्यक आहेत, प्रत्येक देश क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी काय करू शकतो, सर्व देश एकत्रितपणे काय करू शकतात आणि आपण वयक्तिक पातळीवर काय करू शकतो या बद्दल लिहिलं आहे. 

बिल गेट्स यांच्या मते क्लायमेट चेंज रोखणे खूप कठीण आहे (जॉर्डन पीटरसन यांनी जाहीरपणे सांगितलं आहे कि मानवी इतिहास बघता पर्यावरण बदल रोखण्यासाठी सर्व मानवजात एकत्र येणार नाही) अस असलं तरीदेखील हा बदल थांबवणे गरजेचा आहे. जागतिक तापमान वाढीस कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याच विश्लेषण करताना त्यांनी त्याचे परिणाम कोणत्या देशांत, कोणत्या वर्गास, किती प्रमाणात होणार यावर देखील भाष्य केलं आहे. पुस्तकात अनेक आलेख आणि आकडेवारी दिल्या आहेत जेणेकरून वाचकांना त्या सहज समजतील. क्लायमेट चेंज हा विषय अतिशय क्लिष्ट असला तरी तो खूप सोप्यापद्धतीने बिल गेट्स यांनी मांडला आहे. पुस्तकाची भाषा सर्वसामान्यांना सहज समजेल अशीच आहे.

थोडक्यात “हाऊ टू अव्हॉइड अ क्लायमेट डिसास्टर” हे उत्कृष्ट पुस्तक आहे. या पुस्तकामुळे पर्यावरण बदलाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. कदाचित पुस्तक लिहिण्याचा बिल गेट्स यांचा तोच हेतू असावा. पुस्तकाची उत्कृष्ट मांडणी, बोलकी छायाचित्रे, माहितीशीर आलेख आणि सुटसुटिपणा यामुळे पुस्तक उजवं ठरतं. हे पुस्तक सर्वानी वाचायलाच हवं. जरी तुम्हाला क्लायमेट चेंज बद्दल विशेष रुची नसेल तरीही. काहीही नसेल तर देशाच्या विकासात कोणत्या गोष्टी हातभार लावतात, त्यामागचं अर्थगणित आणि त्याचे दूरगामी परिणाम हे सर्व जाणून घेण्यासाठी तर नक्कीच हे पुस्तक वाचायला हवं. विशेषतः बिल गेट्स यांचे आपण सर्वानी आभार मानायला हवेत कारण त्यांना एवढं अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिण्याची आणि पूर्ण मानवजातीला पर्यावरण बदलाशी लढण्याची ब्लु प्रिंट तयार करायची तसं बघायला गेलं तर काहीच गरज नाहीये.  

(*क्लायमेट चेंज बद्दल अजून एक विरुद्ध मतप्रवाह आहे ज्यात क्लायमेट चेंज म्हणजे काही सामर्थ्यशाली लोकांनी चालवलेली खोटी गोष्ट आहे असं मानलं जात. माझ्या वयक्तिक मतानुसार तो मतप्रवाह चुकीचा आहे).  

how to avoid climate disaster bill gates akash jadhav allen lane


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *