inside-marathi-books-na-pathavlel-patra-marathi-book-review-cover

न पाठवेललं पत्र

पोस्ट शेयर करा:

लेखक – महात्रया रा

प्रकाशन – मंजुळ प्रकाशन

प्रकार – ललित लेख

समीक्षण – अक्षय सतीश गुधाटे

पृष्ठसंख्या – १८८

मूल्यांकन – ४.२ | ५

“यश मोठया गोष्टीत असतं… समाधान छोट्या गोष्टीत असतं… ध्यान शून्यात असतं… ईश्वर सर्व गोष्टीत असतो… हेच जीवन आहे.”

पुस्तकाच्या मलपृष्ठावर वाचलेल्या या एका वाक्यामुळे मला हे पुस्तक विकत घ्यायला भाग पाडले. पुस्तक तसे अगदी छोटेच आहे. सलग बसलात तर तासा दोन तासात संपवाल. पण हे पुस्तक औषधासारखे आहे. हळुहळु वाचयला हवे.

“न पाठवलेलं पत्र” हे “महात्रया रा” यांचं एक सुंदर पुस्तक. अनेक छोटछोट्या रोजच्या सवयी आणि वागणुकीत आपण काय आणि कसे बदल करू शकतो, आणि त्याने आपल्या आयुष्यात आनंद कसा द्विगुणित होईल याकरिता हे पुस्तक काही उपाय आपल्याला दाखवून देते. उद्बोधन करणारे हे एक सुंदर पुस्तक आहे. अगदी साध्या भाषेत पुस्तकाचे लेख लिहिले आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद मी वाचला आहे. अध्यात्माची ओढ असणारे हे पुस्तक अशा अनेक कारणाने चर्चेत आहे.. लोकांना आवडत आहे.

अनेकदा आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उकल होत नाही. काही प्रश्न आपणच सोडून देतो. काहींची उत्तर आपल्याला हवी तशी नसतात. मला वाटते त्यातले काही अनुत्तरित प्रश्नांचे नक्कीच तुम्हाला इथे उत्तर मिळेल. गंमत म्हणजे हे पुस्तक अनेक छोट्या लेखांमधून साकारलं गेलं आहे, त्याने पुस्तक रटाळ वाटतं नाही.  आणि या उलट आपण कोणत्याही पानावरून पुन्हा सुरवात केली तरी ते तितकंच खरं वाटतं.

“न पाठवलेलं पत्र” हे सर्वांनी जरूर वाचावं असं पुस्तक आहे. लेखकाने अतिशय सूक्ष्म नजरेने हे सगळे टिपले आहे… तुम्ही पुस्तक वाचल्यावर मला या पुस्तकाबद्दल तुमची प्रतिक्रिया, अभिप्राय नक्की कळवा.

समीक्षण – अक्षय सतीश गुधाटे

na pathavlel patra mahatria ra akshay gudhate manjul Lalit lekt


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:



संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *