लेखक – वीणा गवाणकर
पृष्ठसंख्या – १८४
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
मुल्यांकन – ४.८ | ५
जगाच्या पाठीवर जगणाऱ्या प्रत्येकास जस हवं तस जगायला मिळत का?? आणि ज्यांना मिळतं, त्यांना त्याची किंमत आहे का?? “दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात गायब” याच प्रमाणे सर्वांच्या आयुष्यात काहीना काही विरोधाभास म्हणा किंवा कमतरता ही असतेच. काही लोक म्हणतील यालाच तर आयुष्य म्हणतात ना?? हो अगदी खरंय… पण हेच जर मानवनिर्मित असेल तर?? माणसानेच दुसऱ्या माणसासस जखडून ठेवायचा प्रयत्न केला असेल तर?? आपणच जर लोकांना कमी लेखत असेल तर?? असे अनेक प्रश्न, विविध विचार आणि नवनवीन दृष्टिकनातून तुम्हाला विचार करायला लावणारं हे पुस्तक एक आहे.
वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या “एक होता कार्व्हर” या पुस्तकात अगदीं तुम्हाला तुमचा आतला आवाज ऐकू येत राहतो. सतत जगातील कटू सत्याची जाणिव म्हणा.. किंवा दर्शन म्हणा, देत राहतो. लेखिकेने पुस्तकास नक्कीच आजुन उच्च स्तरावर नेलेले आहे. लिखाण इतके उत्कृष्ट आहे आणि त्याने पुस्तकाचा मूळ गाभा आजुन खुलवण्याचा प्रयत्न सफल करून दाखवला आहे. मी म्हणेन लेखिका नक्कीच पुस्तकास न्याय मिळवून देते.
एक अमेरिकी निग्रो माणूस, ज्याचा जन्म खर तर गुलाम बनून लोकांची सेवा करण्यासाठी झाला होता, त्याने स्वबळावर आपल्या जिज्ञासू वृत्तीने, चिकाटी दाखवून सगळ्यांना अवाक् करणाऱ्या काही गोष्टी कशा केल्या, याची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हे पुस्तक आहे. आणि फक्त एकच नाही तर सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामांची यादी आपल्याला निशब्द करून टाकते. वर्णभेद हा त्या काळातील अमेरिकन लोकांमधील एक खूप मोठा आणि लाजिरवाणा प्रकार होता. कृष्णवर्णीय लोकांना तिथं खालचा दर्जा दिला जात असे, अशातच एका लहानशा मुलाचा, डोळे विस्फारून टाकणारा सौम्य लढा, तुमच्या हृदयावर बराच खोल घाव करून जातो. नशिबात लिहलेले सगळ तुम्ही बदलू शकता, तुम्ही तुमच्या स्वतचं जीवन हवं तसच जगू शकता याच एक उत्तम उदाहरण म्हणजे “जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर” आणि त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंच दर्शन लेखिकेने करून दिले आहे.
हे पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल, जीवन आत्मज्ञानानं सजवायला शिकवेल, हसत खेळत रंगवायला शिकवेल आणि त्याचा आनंद अगदी मोठ्या मनानं लुटायला तर शिकवेलच, पण त्याहूनही तो दुसऱ्यांच्या वाट्यालाही यावा, यासाठी लढायला ही शिकवेल. मला वाटतं हे पुस्तक एक समजाच्या विषमतावादी विचारांच्या गर्तेत एक मैलाचा दगड आहे. सर्वांनी नक्कीच वाचावं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या मागील मुद्दा एक मनात हुरहूर नक्कीच लावण्यात यशस्वी होतो अस म्हणावं लागेल. “अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासमुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा मागे फिरून कर्व्हारने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषीसंसकृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.”
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
माझ्या यु ट्यूब लिंक वर तुमच्या या साईटचा एक screenshot टाकला आहे
कृपया एक होता कार्व्हर बघावे..तुम्ही पुस्तक जगवायला मेहनत घेताय म्हणून कौतुक!
(हे पुस्तक अनुवादित नाही..केवळ संदर्भ वापरले आहेत)
https://www.youtube.com/channel/UC5zy65_c3QjqplEcSuBR1tQ
हे पुस्तक खरंच खूपच सुंदर आहे .
तो मुलगा खूप काही शिकवून जातो .
आपण पूर्ण त्या प्रसंगाशी रममाण होतो आणि हे लेखिकेची उत्कृष्ट लेखन शैली दाखवते .
अगदीं खरं आहे!!
वीणा गवाणकर यांनी अशा अनेक अद्भुत व्यक्ती मराठी साहित्याने लोकांसमोर आणल्या आहेत!!
☺️🙏
खरंच खूप सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक जण जीवनात काही तरी करतात .पण कायम मनावर अधिराज्य करतात ते काही वेगळे असतात.
एक होता कार्व्हर ह्या पुस्तकातुन कार्व्हर कसे होते ते समजले आणि एक सुधारणावादी झपाटलेले माणूस जगाचे कसे कल्याण करू शकते ह्या पुस्तकामुळे समजले..
कार्व्हर तुम्ही परत या…
होय.. अगदी खरं आहे!
खरंच खूप सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक जण जीवनात काही तरी करतात .पण कायम मनावर अधिराज्य करतात ते काही वेगळे असतात.
एक होता कार्व्हर ह्या पुस्तकातुन कार्व्हर कसे होते ते समजले आणि एक सुधारणावादी झपाटलेले माणूस जगाचे कसे कल्याण करू शकते ह्या पुस्तकामुळे समजले..
विना गवानकर यांनी खूप परिश्रम करून ही कलाकुर्ती सादर केली .त्यांचे मनापासून धन्यवाद…
कार्व्हर तुम्ही खूप महान होता…