लेखक – अच्युत गोडबोले, अतुल कहाते
पृष्ठसंख्या – १६४
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्यांकन – ४ | ५
स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्वावर अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत पण अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते लिखित स्टीव्ह जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ हे पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर मराठी भाषेत स्टीव्ह जॉब्जवर लिहिलेलं हे पाहिलं पुस्तक आहे. अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी हे पुस्तक विक्रमी वेळात लिहून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवतं .
अँपल या कंपनीचा गॅरेज ते जगप्रसिद्ध होण्याचा प्रवास आणि स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास या दोन गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत कि त्या वेगळ्या करणे जवळ जवळ अशक्य. लेखकांनी पुस्तकात हा गुंता योग्यरित्या हाताळलेला आहे. ज्यांना स्टीव्ह जॉब्ज अधिकृत चरित्र वाचण्यासाठी वेळ नाहीये त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे.
पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे. ते आपल्याला स्टीव्हची अँपल कंपनीवर असलेली छाप दाखवून देत. पुस्तकात स्टीव्हची काही कृष्णधवल छायाचित्रंही आहेत जे वाचकांना पुस्तकाच्या नायकाशी कनेक्ट करायला मदत करतात. नक्की स्टीव्ह जॉब्ज कोण होता?? त्याला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली?? त्याने कोणती उत्पादन बाजारात आणली?? त्याची व्यवस्थापन पद्धत कशी होती?? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. हे पुस्तक विशेषतः कॉम्पुटर / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहित करेल.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: