Exclusive Biography of Steve Jobs - स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र

स्टीव्ह जॉब्झ अधिकृत चरित्र

पोस्ट शेयर करा:

लेखक : वॉलटर आयझॅक्सन

अनुवाद: विलास साळुंके

पब्लिकेशन: डायमंड पब्लिकेशन्स

मुल्यांकन – ४ | ५

स्टीव्ह जॉब्झ हा एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान क्षेत्रातील जादुगार. स्टीव्ह जॉब्झने जगाला मॅकिन्टॉश कॉम्प्युटर, आयपॉड, आयफोन, आयपॅड इत्यादी अचंबित करणारी उपकरण दिली. करिअरच्या सुरुवातीला मिळालेलं अद्भुत यश आणि तिशीत स्वतःच्या कंपनीतुन झालेली हकालपट्टी आणि परत एकदा अद्भुत यश असे टोकाचे दिवस त्याने पाहिले. कॅन्सर सारखा दुर्देवी आजाराने देखील न डगमगता या पट्ट्याने नवनवीन उपकरणं सादर करण्याचा सपाटाच लावला आणि एकविसाव्या शतकातील पाहिलं दशक त्याने स्वतःच्या नावे केलं.

स्टीव्ह जॉब्झच हे अधिकृत चरित्र मी आता पर्यंत तीन वेळा वाचल आहे. हे चरित्र वाचताना स्टीव्ह जॉब्झ तुमच्या अवतीभवती फिरत असल्याचा भास होतो यातच लेखकाचं यश मानायला हवं. विलास साळुंके यांनी अनुवादाचं शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलेल आहे. या चरित्रात तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक संदर्भ आहेत, त्याचा अनुवाद देखील विलास साळुंके यांनी उत्तमरित्या हाताळला आहे. पुस्तकात असलेले स्टीव्ह जॉब्झची छायाचित्रेही अप्रतिम आहेत. 

या चरित्रात स्टीव्ह जॉब्झ ने त्याच्या मित्रासोबत अँपल कंपनी कशी सुरु केली याची प्रेरणादायी कथा तर आहेच पण त्याबरोबर स्टीव्हच्या स्वभावाचे विविध पैलू लेखकाने जसेच्या तसे मांडले आहेत. स्टीव्ह जॉब्झचा बंडखोर स्वभाव नकळतच अँपलच्या जनुकात कसा आला हे देखील आपल्याला समजतं.  

आपल्याकडे उपकरणांच्या डिझाईन बाबत जास्त उत्सुकता दिसून येत नाही पण स्टीव्हच डिझाईन बद्दल असलेलं प्रेम बघून तुम्ही नाक्कीच चकित व्हाल. त्याच्या डिझाईनच्या या वेडामुळेच अँपलचे सर्व उपकरणं आणि सॉफ्टवेअर अतिशय विचारपूर्वक बनवली जातात. स्टीव्हची अशी ईच्छा होती कि त्याला एक चिरंतन काळ टिकणारी कंपनी उभी करायची होती जिथे लोक तंत्रज्ञाच्या नवनवीन सीमा गाठतील आणि त्यात तो यशस्वी झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. स्टीव्ह जॉब्झच निधन २०११ साली झालं, त्यानंतरही अँपल आपलं स्वतःच वेगळेपण जपून आहे आणि आजही तंत्रज्ञानक्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे. 

आज आपण वापरत असलेले कॉम्प्युटर खरतर स्टीव्हच्या प्रयत्नांतून आलेले आहेत. सर्वसामान्यांसाठी बनवलेला पहिला कॉम्पुटर मॅकिन्टॉश  त्याने १९८४ मध्ये बाजारात आणला. मॅकिन्टॉश घडवण्याची त्याची धडपड आणि टीमकडून काम करून घेण्याच्या पद्धती भन्नाट आहेत. हे पुस्तक वाचून तुम्ही उपकरण किंवा प्रॉडक्ट घडवतानाच्या बारीकसारीक गोष्टीकडे आपसूकच लक्ष देऊ लागल.         

हे पुस्तक काही मॅनॅजमेन्टशी निगडित नाही किंवा व्यवसायाशी हे एक चरित्र आहे पण यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, मॅनॅजमेन्टचे धडे मिळतील, आधुनिक व्यवसाय कसा करावा हे देखील कळेल.  

जर तुम्ही कॉम्पुटर / सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी मेजवानी ठरेल. चरित्र जरी स्टीव्हच्या बालपणापासून पुढे पुढे सरकत असलं तरीही काही ठिकाणी लेखकाने भविष्यातील दुवे जोडले आहेत.

मला या चरित्रातील सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे “भैरवी”. या प्रकरणात स्टीव्हच मनोगत आहे. त्याच मनोगत म्हणजे तंत्रज्ञान आणि आध्यात्म या दोन्हीची सांगड घालून मानवी जीवन कसं सुखकर करता येईल याविषयीचे त्याचे विचार.        

एकविसाव्या शतकातील या महान नायकावर अनेक पुस्तक आली, अनेक चित्रपट आले पण या चरित्रातून तुम्हाला स्टीव्ह जॉब्झ जसा उलगडेल तसा तो इतर कोठेही उलगडणार नाही.

कॉम्पुटर / सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचा. मराठी वाचकांनी सातासमुद्रापार एका व्यक्तीने कशी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवली हे जाणून घेण्यासाठी हे चरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. 

steve jobs apple walter isaacson technology diamond akash jadhav vilas salunke


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या


संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *