becoming steve jobs book review in marathi

बिकमिंग स्टिव्ह जॉब्ज

पोस्ट शेयर करा:

लेखक  – ब्रेंट श्लेनडर, रिक टेटझेली 

समीक्षक – कुणाल घोडेकर

प्रकाशन – सेप्टर प्रकाशन 

पृष्ठसंख्या – ४१२

मुल्यांकन – ३.९ । ५

एक बेफिकीर धनाड्य कसा द्रष्टा प्रवर्तक बनला याची कहाणी म्हणजेच “बिकमिंग स्टिव्ह जॉब्ज”.

स्टिव्ह जॉब्जवर इतकी पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत कि आता फक्त त्यांना देवत्व प्राप्त व्हायचं बाकी आहे. अर्थात स्टिव्ह जॉब्ज हे व्यक्तीमत्व देखील तितकंच विलोभनीय आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. पुस्तकात  स्टिव्हच्या आणि त्याच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींची रंगीत छायाचित्रेही दिली आहेत. ज्यांना  स्टिव्ह जॉब्ज कोण? हे माहित नाही त्यांनी देखील अँपल कंपनी बद्दल कधी ना कधी तरी ऐकलंच असेल.

स्टिव्ह जॉब्ज हे अँपल कंपनीचे सहसंस्थापक. त्यांनी अँपल वडिलांच्या गॅरेज मधून जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी बनवली. पण त्यांचा हा प्रवास सुखकर नव्हता. अँपल यशाच्या शिखरावर असताना  स्टिव्हची स्वतःच्याच कंपनी मधून हकालपट्टी करण्यात आली. नंतर त्यांनी नेक्स्ट कंपनी सुरु केली आणि पिक्सर या कंपनीत मोठी गुंतवणूक केली. पुढे अँपल मध्ये परतल्यानंतर  स्टिव्हने जगाला उत्तोमोत्तम उपकरणं दिली. या सर्वांमध्ये  स्टिव्ह कॅन्सरशी लढा देत होता ते वेगळंच.

स्टिव्ह जॉब्ज हे एक अजब रसायन होत हे तुम्हाला पुस्तक वाचताना प्रत्येक क्षणाला जाणवत राहील.  स्टिव्हच्या अधिकृत चरित्रात जे प्रसंग मिसिंग आहेत ते या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील.  स्टिव्हच्या आयुष्यातील बऱ्याच घटना ऐतिहासिक दृष्ट्या (संगणक क्षेत्रासाठी) अत्यंत महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळच महत्व आहे.

जर तुम्हाला स्टिव्ह बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक जरूर वाचा किंवा स्टिव्हच अधिकृत चरित्र वाचणे जास्त योग्य राहील.  

समीक्षक – कुणाल घोडेकर

becoming steve jobs kunal Ghodekar apple brent schlender rick tetzeli sceptre


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]




संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *