Rich Dad Poor Dad - रिच डॅड पुअर डॅड

रिच डॅड पुअर डॅड

पोस्ट शेयर करा:

लेखक: रॉबर्ट कियोसाकी

अनुवाद: अभिजित थिटे

प्रकाशन: मंजुल पब्लिशिंग हाऊस         

पृष्ठ संख्या:२०१

मुल्यांकन: ४ | ५

मराठी भाषेत आर्थिक शिक्षण या विषयावर फार कमी लेखन झालं आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं  “रिच डॅड पुअर डॅड” या पुस्तकाचं मराठी भाषांतर ती कमी भरून काढतं. हे पुस्तक म्हणजे पैशांबद्दल असलेल्या प्रस्तापित विचारांना आव्हान आहे. 

बालपणीपासून अर्थाजनाविषयी झालेले दोन वेगवेगळे संस्कार यांविषयी रॉबर्ट यांनी कथा गुंफून आर्थिक शिक्षण हा रटाळ विषय मनोरंजक बनवला आहे. रॉबर्ट यांचे वडील हे एक शिक्षक आहेत (ज्यांचा उल्लेख पुअर डॅड असा केला आहे) आणि रॉबर्ट च्या मित्राचे वडील (जे रॉबर्ट चे आर्थिक गुरु आहेत व ज्यांना रॉबर्ट रिच डॅड म्हणतात) या दोघांच्याही पैशांबद्दल विचारसरणी परस्परविरोधी आहेत. या परस्परविरोधी विचारसरणीत रॉबर्ट वाढले. त्यांनी दोन्ही विचारसरणीचे परिणाम जवळून पहिले आणि पुढे आयुष्यात त्यांनी दोन्हीही विचारसरणी वापरून पहिल्या आणि शेवटी त्यांनी रिच डॅड विचारसरणीच अनुसरण केलं.

पुअर डॅड नेहमी काटकसरीने वागून पैशांबद्दल आकुंचित विचार ठेवत तर रिच डॅड पैशाने आणखी पैसे कसे मिळवता येतील याकडे लक्ष देत. या पुस्तकात  प्रचलित आर्थिक समजुतींना सरळ सरळ आव्हान दिल गेलं आहे. कॅशफ्लोचा सिद्धांत सामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत लेखकाने मांडला आहे आणि तो या पुस्तकाचा गाभा आहे.

अर्थातच हे पुस्तक वाचून तुम्ही लगेचच श्रीमंत व्हाल असं नाहीये पण जर तुम्ही रॅट रेस मधून बाहेर पडू इच्छिता तर हे पुस्तक तुम्हाला दिशा दाखवू शकेल. रॉबर्ट यांनी त्यांच्या आयुष्याची बरीच वर्षे नोकरी करण्यात व्यतीत केली आहेत नंतर त्यांनी रिअल इस्टेट मधून तुफान पैसे मिळवले आणि नंतर हे पुस्तक लिहलं. रॉबर्ट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमवेत देखील पुस्तक लिहलं आहे.

अभिजित थिटे यांनी अनुवाद उत्तमरीतीने केला आहे. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक माझ्यामते सर्वानी एकदातरी वाचायला हवं आणि विशेष करून तुमच्या मुलांना आर्थिक शिक्षणासाठी हे पुस्तक वाचायला द्यायला हवं.

rich dad poor dad robert kiyosaki manjul akash jadhav


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या


संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

1 Comment

  • मी नौकरीला लागून काहीच दिवस झाले होते. आणि माझे पैसे शिल्लक राहतात, हे नुकतेच लक्षात आल्याने मी माझ्या भावास गुंतवणुकीबाबत विचारले असता, त्याने मला या पुस्तकाबद्दल सांगितले. पुस्तक अगदीच साधारण वाटते, पण नावामुळे मनात खूप काही प्रश्न निर्माण करते आणि म्हणूनच वाचायला अजूनच आवड निर्माण होते. आयुष्यात सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे पैसे सांभाळणे, पैश्यांचे शिक्षण. जे आपल्या देशात सर्वाधिक कमी शिकवले जाते याची खंत वाटते. पण या पुस्तकाने ती खंत, ती काळजी संपवली असे म्हणता येईल.

    पैश्याची चिंता, पैसे कसे कमवावे, कसे टिकवावे आणि कसे वाढवावे या सोबतच, त्याबाबतची खोटे आणि मिथ्या असलेल्या अनेक गोष्टींची बारीक नोंद यात करून दिली आहे. यात लेखकाने अतिशय सुंदर प्रकारे त्याचे श्रीमंत वडील आणि गरीब वडील यांच्यातील पैश्यांबाबताची विचारांची तफावत त्याने मांडली आहे आणि त्यातील त्याला पटलेल्या विचारांची त्यांनी पाठराखण केली आहे. आणि त्या विचारांना उदाहरणादाखल पटवूनही दिले आहे.

    रिअल इस्टेट मध्ये मागच्या काही दशकात बक्कळ पैसा कमवलेला हा लेखक, अनेक चुकीच्या गोष्टी आपल्यावर आपण लादून घेतो हे पटवत असतो. पुस्तकात त्यांनी पैशांचा प्रवाह आकृत्या द्वारे बारीक आणि वेगवेगळ्या परिस्थितीत कसा असावा हे रेखाटले आहे, आणि ते सर्वांना समजावे याची देखील त्याने काळजी घेतली आहे.

    तुमच्या जगण्याला बळ आणि कलाटणी देणारं हे पुस्तक. आयुष्याच्या कोणत्याही वयोगटातील लोकांना हे नक्कीच उपयोगाचं ठरेल. वाचावं, विचार करावा आणि आमलात आणावं अस जगण्याचं परखड विश्लेषण करणार हे पुस्तक. नक्कीच तुम्हाला अनेक अंगाने विचार करायला लावेल आणि समृद्ध करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *