लेखक: नेपोलियन हिल
अनुवाद: बाळ ऊर्ध्वरेषे
प्रकाशन: मंजुल पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या: २३८
मुल्यांकन: ३.५ । ५
व्यक्तिमत्व विकास या पुस्तक श्रेणीत टॉप १० मध्ये असलेलं, आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तक म्हणजे थिंक अँड ग्रो रिच. मला माहित असलेलं सर्वात जुनं self-help पुस्तक.
“थिंक अँड ग्रो रिच” किंवा “विचार करा आणि श्रीमंत व्हा” असं लक्षवेधी नाव असलेलं (बऱ्याच जणांच्या दृष्टीने हास्यापद) पुस्तक तुम्हाला एका रात्रीत नक्कीच श्रीमंत बनवणार नाही पण आर्थिक विषयांत तुमची “मानसिकता” (mindset) बदलेल.
अँड्रयू कार्नेगी (अमेरिकेतील पहिल्या पिढीतील उद्योजक) यांनी व्यक्तीगतरित्या श्रीमंत होण्यासाठी च गुपित या पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल यांच्यासमोर उघड केलं होत. नंतर नेपोलियन हिल यांनी आयुष्याची वीस वर्षे खर्ची पाडून, असंख्य लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि ते गुपित पडताळून पाहिलं ज्याने काही लोकांना अतिश्रीमंत श्रेणीत नेऊन बसवलं. या पुस्तकात ते गुपित उघड उघड लिहलं नाहीये तर ते लपवून ठेवलं आहे. आणि लेखकाच्या मते हे गुपित पुस्तक वाचताना तुमच्यासमोर अचानक प्रकट होईल. लेखकाने श्रीमंत होण्यासाठी काही भक्कम पाऊले सांगितली आहेत. अशाप्रकारची पद्धत मला कोणत्याही पुस्तकात लिहलेली आढळलेली नाहीत. जरी आपण पुस्तकाबद्दल शंका घेऊ शकत असलो तरी पुस्तक वाचताना कुठेही लेखक आपल्याला फसवत आहे असं वाटत नाही.
बऱ्याच यशस्वी लोकांनी (जस कि रॉबिन शर्मा आणि संदीप माहेश्वरी) या लोकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे असं म्हटलं आहे. आर्थिक मानसिकता बदलण्यासाठी या पुस्तकात सांगितलेल्या पद्धिती थोड्या विचित्र वाटू शकतात पण जर तुम्ही लेखकावर विश्वास ठेवू शकता तर या पद्धती अवलंबून पाहा.
थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक जवळपास १०० वर्षांपूर्वी लिहलं असलं तरीही आजही उपयुक्त आहे आणि कालबाह्य वाटत नाही. या पुस्तकाचं मराठी अनुवाद मला तितकासा आवडला नाही. किंवा आपण म्हणू शकतो कि अनुवादकाने मूळ पुस्तकाला न्याय दिला नाहीये. जर तुम्ही इंग्रजी वाचू शकत असाल तर मी नक्कीच म्हणेन कि मूळ पुस्तक वाचा कारण लेखकाचे मुळ विचार समजून घेणे या विषयात इष्ट आहेत.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या
1 Comment