लेखक : रोंडा बर्न
अनुवाद: डॉ.रमा मराठे
पब्लिकेशन: मंजुल पब्लिशिंग हाउस
मुल्यांकन: ३.५ । ५
द सिक्रेट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले पुस्तक २००६ च्या सुमारास प्रकाशित झाले. विचारांची उत्पत्ती आणि त्याच आपल्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम यावर हे पुस्तक भाष्य करते. लेखकाच्या मते,विचारांचा आपल्या आयुष्यावर होणारा व्यापक परिणाम लक्षात घेता आपले जीवन बदलण्याची शक्ती ही विचारातच आहे. हे वास्तव समाजातील एका विशिष्ट वर्गालाच ज्ञात होते आणि इतरांपासून ते जाणीवपूर्वक लपवण्यात आले. लपविलेले हेच गुपित द सिक्रेटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
आपल्या विचारांना असलेली फ्रिक्वेन्सी समान विचारांना आपल्याकडे आकर्षित करते आणि त्यातून ब्रह्माण्डामधील एक अदृश्य शक्ती आपले कल्पनेतील विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करते. यालाच आकर्षणाचा सिध्दांत असे नाव दिले आहे.आपण इच्छित संपत्ती, मित्र, गाडी कधीही मिळवू शकतो.या साठी त्या गोष्टी आपण ब्रह्माण्डाकडे मागितल्या पाहिजेत, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे मागितले आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.
या संकल्पने बद्दल अनेक विचार प्रवाह आणि मतमतांतरे असून, हा सिद्धांत सगळ्याच ठिकाणी कार्यन्वित असतो या बद्दल ठोस शास्त्रीय आधार मागणारी मंडळी प्रतिवाद म्हणून या संकल्पनेवर अविश्वासहि दाखवतात.
या पुस्तकात इतिहासातील अनेक महान लोक, शास्त्रज्, कवी , नेते यांची या संकल्पनेस अनुसरून असलेले संदर्भ लेखिकेने दिले आहे.या पुस्तकाच्या यशानंतर द नायक, द मैजिक ही पुस्तके देखील हाच सिध्दांत अधोरेखित करतात. या सिद्धांताचा मानवी संबंधावर असणारा परिणाम हा संपूर्ण जगामध्ये सकारात्मक परिणाम घडविण्यास सज्ज आणि सक्षम आहेत.
एकूणच आपण आपले विचार, भावना आणि कल्पना यांना योग्य ती दिशा देवून हवे ते इच्छित साध्य करू शकतो. हा आकर्षणाचा सिध्दांत आजवर आणि यापूर्वी आईनस्टाईन, सॉक्रेटीस, सेक्ष्पियर यांनीही अधोरेखित केला आहे. हा सिध्दांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यन्त घेऊन जाण्याचा रस्ताच जणू या पुस्तकातून लेखिकेने दाखवला आहे.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या
Nicely written.