the oath of vayuputrs marathi book cover

शपथ वायुपुत्रांची

पोस्ट शेयर करा:

लेखक – अमिश त्रिपाठी

पृष्ठसंख्या – ६७४

अनुवाद – डॉ. मीना शेटे – संभू 

प्रकाशन – अमेय प्रकाशन

मुल्यांकन – ४.२ | ५

शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील तिसरे पुस्तक.

शिवाला पंचवटीत सैतानाचा शोध लागतो आणि आता तो सैन्य जमवून सैतानाच्या विनाशासाठी आगेकूच करतो. आणखी दोन रहस्य त्याच्या समोर येतात. वायुपुत्र कोण आहेत?? शिवाचा आणि वायुपुत्रांचा काही संबंध आहे का?? ते त्याला मदत करतात का?? शिवा सैतानाला हरवतो का?? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या भागात मिळतात.

शपथ वायुपुत्रांची मध्ये तत्कालीन राजकारण, युद्धाचे डावपेच यथोचित मांडले आहेत. तत्कालीन भारतातील विज्ञान अतिप्रगत रेखाटण्यात आलं असलं तरीही त्याची मांडणी कुठेही अति झाली आहे असं वाटत नाही. अमिशचा हातखंडा असलेलं युद्धप्रसंग या पुस्तकात देखील वाचकांना युद्धभूमीवर घेऊन जातात. कथेचा कालखंड मोठ्या अंतराचा आहे. वाचकांना समजेल अश्या पद्धतीने शिवाची रणनीती मांडली गेली आहे. शिवाला जरी महादेवत्व प्रात्प झालं असलं तरीही या भागात तोहि एक सामान्य पुरुषच आहे असं प्रकर्षाने जाणवत राहतं.

मागील दोन भागातील म्हणजेच मेलुहाचे मृत्युंजय आणि रहस्य नागांचे यांतील बरेचसे दुवे या भागात जोडले गेले आहेत त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अनुत्तरतीत प्रश्नांची उकल होते. तुम्ही कितीही विचार केलात तरीही शिवावरील पुस्तकांच्या या मालिकेचा याहून योग्य अंत होऊ शकत नाही. कथेची लांबी नक्कीच कमी करता आली असती पण ती एक गोष्ट सोडल्यास इतर सर्व गोष्टी उत्तम जमून आल्या आहेत.

shiva triology oath vayuputras amish tripathy ameya meena shete sambhu akash jadhav kadambari mythology mythological shapat shapath vayuputranchi vayuputra vayuputr


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या


संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *