the secret of nagas marathi book cover

रहस्य नागांचे

पोस्ट शेयर करा:

लेखक – अमिश त्रिपाठी

पृष्ठसंख्या – ४२०

अनुवाद – डॉ. मीना शेटे – संभू 

प्रकाशन – अमेय प्रकाशन

मुल्यांकन – ४.५ | ५

शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरे पुस्तक.

मागील भागात बृहस्पतींच्या हत्येनंतरची कथा या भागात पुढे नेली आहे. शिवा ज्या नाग योध्याच्या मागावर आहे तो योद्धा आता सतीच्या मागावर आहे. हा नाग योद्धा नक्की कोण आहे हे वाचणेच जास्त इष्ट कारण वाचकांसाठी हा एक धक्का असेल. शिवा सैतानाच्या शोधात आहे आणि हा शोध त्याला नागांपर्यंत पोचवेल असा त्याला ठाम विश्वास आहे.

कथा जरी साधी सरळ वाटत असली तरी या कथेत असंख्य पात्र, कट-कारस्थान आणि राजकारण आहे. पुराणांतील बरेच संदर्भ या कथेत सुंदररित्या गुंफले आहेत. कथा तुम्हाला भारतातील प्राचीन शहरांची सफर घडवून आणेल आणि तुम्हाला त्यांचा रंजक इतिहास देखील उमजेल. अमिश यांच्या लेखनशैलीच कौतुकच पण अनुवाद करताना कथेच्या मूळ गाभ्याला जराही धक्का लागू दिला नाही या बद्दल डॉ. मीना शेटे – संभू  यांना हि तितकंच महत्व दिल गेलं पाहिजे. हा अनुवाद इतका चपलख आहे कि मूळ कथा मराठी भाषेतच लिहिली आहे कि काय असं वाटून जात.

कथा पुढे सरकत असताना शिवाचे तत्वज्ञान आजच्या काळानुसार देखील योग्य आहे असं वाटतं. तीन पुस्तकांच्या मालिकेतील रहस्य नागांचे हे पुस्तक लोकांच्या अधीक पसंतीस पडत कारण यात कथा इतक्या कलाटण्या घेते कि तुम्हाला पुढे नक्की काय होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहते. आणि ज्या पद्धतीने रहस्य उघड होतात ते बघून अजूनच आश्चर्य होत.

या भागातील युद्ध प्रसंग देखील वाचकाच्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभारण्यात लेखक यशस्वी ठरतो. कथेच्या शेवटी जेव्हा शिव त्याच्या ताफ्यासोबत ‘पाताळ लोकात’ पोचतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. या पुस्तकाच्या शेवटच्या दोन ओळी एक मोठ्या रहस्याचा खुलासा करतात आणि रहस्य नागांचे पुस्तक वाचल्याचं समाधान देतात. लेखक अमिश त्रिपाठी यांनी असच धक्का तंत्र प्रभू रामचंद्रांवरील पुस्तकांच्या मालिकेत देखील वापरलं आहे.

या कथेच्या पुढच्या भागात म्हणजेच शपथ वायुपुत्रांची मध्ये शिवाचा सैतानाशी लढा आहे

अर्थात कथा काल्पनिक असली तरी असं वाटत राहत कि जर हेच सत्य असेल तर?? हाच आपला इतिहास असेल तर??    

shiva triology secret secrets nagas naga amish tripathy ameya meena shete sambhu akash jadhav kadambari mythology mythological rahasya rahasy naganche


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/6822/rahasya-naganche-amish-tripathi-westland-buy-marathi-books-online-at-majesticreaders-9789383260294″]




इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या


संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *