लेखक – ना. सं. इनामदार
पृष्ठसंख्या – ४१८
प्रकाशन – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
मुल्यांकन – ४.६ | ५
बाजीराव पेशवा… हे नाव न ऐकलेले कान हिंदुस्तानात बोटांवर मोजण्याइतके असतील. पण बाजीरावांची कथा म्हणजे फक्त काही मस्तानी नव्हे. त्यांचा जीवनपट सांगण्यासाठी अनेक मालिका आणि सिनेमेदेखील तयार झाले, पण तरीही रंजक कथानकांसाठी इतिहासाच्या पानांना थोडासा वळसाच दिला जातो अस मला वाटतं. बाजीराव म्हणजे ४० लढाया अजिंक्य राहिलेला एक महान योद्धा, संपूर्ण विश्वात सगळ्यात अव्वल सेनापती म्हणून म्हणून विश्वविख्यात असे नाव म्हणजे बाजीराव. एका वेळी दोन्ही हातात २ दांडपट्टे घेऊन, पायांच्या लकबिने घोडा पुढे पळवित १५ मुंडकी एका घावत उडवणारा हा वीर… ज्याने हिंदुस्तान पुन्हा एकत्र केला. त्याच्या तलवारीला आणि शत्रूस दमवून पकडण्याला सगळेच घाबरून असत. एका पोवड्यात त्याच वर्णन अगदी संस्मरणीय आहे.” खणखणले भाले तलवार, गर्जती वीर, वीर हर हर… महादेव रणी दंग झाला, भिडला योद्धा योध्याला, समररंगणी बाजी आला र… जी जी जी… ” असे काळभैरवाचे रूप घेऊन रणांगण गाजणारा एक महान योध्दा आपण नीटसा ओळखतच नाही याचं नक्कीच वाईट वाटतं. आणि तुम्हाला हे माहित करून घ्यायच असेल तर “राऊ” ही कादंबरी त्यावर नक्कीच एक उपाय आहे.
ना सं इनामदार यांच्या लेखणीतून उतरलेल्या या बाजीरावांच्या जीवनकथेवर अनेक मराठी लोकं मोहित आहेत. या कादंबरीचं भाषा साैंदर्य, इतिहासाची साक्ष आणि नात्यांची अलगद कापूरवेल या साऱ्यांची एक सुंदर अनुभव देणारी कलाकृती आहे. यासोबतच त्या वेळची समाजव्यवस्था, जुनी भाषा आणि आजूबाजूची परस्थिती आपल्याला त्या काळात घेऊन जाते. या भावविश्वाला आजुन खुलवत ते म्हणजे काशीबाई आणि बाजीराव यांचा एक गोड नातं. तसेच घरातील इतर अनेक नाती जपण्याचा खटाटोप. रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही कादंबरी नात्यातील वीण तर जपून आहेच मात्र त्यासोबतच २० वर्षातील ४२ युद्धांचे तपशील देखील तितक्याच सहजपणे आणि बारकावे लक्षात घेऊन लिहले आहेत. हे सगळं असतानाही अजिंक्य असलेला योद्धा जेंव्हा कुटुंबकलहात अडकतो तेंव्हा आपल्याच माणसांसमोर पराभूत होतो अन त्या पराभवाच्या दुःखात व्याकुळ होणारा बाजीराव पेशवा रेखाटताना इमामदारांनी ओतलेले शाब्दिक, भावनिक रस मनात घर करून जातात.
त्यांचं सगळ्यात मोठा यश म्हणजे त्यांनी बदललेली युद्धशैली, सैन्यातून पायदळ आणि तोफखाना तर वगळलाचं पण सैन्याच्या वेगाने आणि अनपेक्षित हल्ल्याने शत्रूला बेसावध असताना पकडण्यात त्यांच्या सैन्याचा कौतुक करावे तितके कमीच आहे. यात त्यांनी जोडलेली माणसं आणि मुलुख त्यांचं नेतृत्व आणि बुद्धिमत्ता याचंच उदाहरण आहे. मल्हारराव होळकर, पिलाजी गायकवाड, जय्यापा शिंदे, कदम पांडे, पवार, रास्ते, मेहंदळे यांच्या जोडीने बांधलेली सेना काशी हरू शकते ?? इतकं सैन्य अन इतके जेवला जीव देणारे गोळा करणारा माणूस फक्त मस्तानी आणि नाच गाण्या पुरताच मर्यादित नव्हता हे सतत पावलोपावली या कादंबरीने दाखवून दिलं आहे.
राऊ केवळ बाजीरावाची कहाणी नाही तर पुण्याच्या मध्यभागात फक्त महादरवाजा व तटबंदी घेऊन उभा ठाकलेल्या शनिवार वाड्याचीही आहे. पुण्याच्या वैभवात भर घालणारा सात मजली वाडा व त्या वाड्यासाठी चिमाजी अप्पांनी घेतलेले कष्ट, त्यात स्थापत्यशास्त्राचे असलेले नमुने साक्षात समोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. हजारी कारंजे, आरसा महल, अनेक प्रकारची दालने अन त्या काळात त्याच असलेलं वैभव कळल्यानंतर शनिवारवाडा आपसूकच साद घालतो ते वेगळं!
हिऱ्याला कोळशाचा काळा रंग मलिन करूच शकत नाही. असच सुंदर आणि मनमोहक आयुष्य जगलेल्या या व्यक्तीचं तुम्हाला नक्कीच अप्रूप वाटेल. तुमचे विचार बदलायला लावणारी ही कादंबरी आहे. त्यांचं आणि मस्तानीच खर नातं काय ?? घरात कशी परिस्थिती होती?? त्यांनी नक्की मराठी मातीला काय दिले ?? याच उत्तर हवं असेल तर नक्की वाचा ना सं इनामदार यांचे लेखणीतून अवतरलेली राऊंची कहाणी.
|| वदे नर्मदा तापी, बाजीराव प्रतापी ||
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या
#राऊ
अनेकदा इतिहासातील पुस्तके वाचनात आलेली होती. मग आपसूकच ‘राऊ’ ही कादंबरी वाचण्याची इच्छा झाली. हे पुस्तक वाचताना इतिहासातील अनेक महत्वाची पाने उलघडण्यास मदत झाली आणि ना.स. इनामदार या लेखकाची लिहण्याची शैली वाचनातून अनुभवायला मिळाली.
‘राऊ’ या कादंबरीतुन आपल्याला बाजीराव पेशवे यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टींचा थरारक अनुभवायला मिळतो. बाजीरावांचे अनेक पैलू आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळतात.
बाजीरावांवर दौलतीलचा भार खूप लवकर आला होता. एवढ्यामोठी दौलतीची जबाबदारी सांभाळण्यास त्यांचा मोठा भाऊ चिमाजी आप्पा यांचाही हातभार लागला. बाजीराव आणि चिमाजी अप्पा नेहमी मोहिमेवर असल्यामुळे फडा वरची कामे पंत व नानासाहेब बघत होते. काशीबाई बरोबर लहानपणी खेळलेल्या भानुचा पती गोपाळभट अत्रे यांच्या भांडणातील निवाड्यात पुरंदरकडून निर्णय दिल्यामुळे आमच्यावर पेशव्यांनी अन्याय केला असा तिचा समज झाला आणि माझा तळतळाट कधी भोवल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद दिला. नानासाहेब साताऱ्याच्या दरबारात दौलतीलचा कामाच शिक्षण घेत होते. इकडे राऊस्वामी एकेक मोहीम फत्ते करत दौलतीलचा पसारा वाढवत होते. पेशव्यांनी कित्येकदा मोगलांना धूळ चारून मराठ्यांचा धबधबा निर्माण केला होता. बाजरावांची मातुश्री राधाबाई ह्या खूप कडक शिस्तीच्या होत्या. त्यांना दोन लेकी होत्या. एक भिऊबाई आबाजी नाईकांना दिलेली आणि अनुबाई व्यंकटराव घोरपाड्यांना दिली होती.
दाभाड्यांची महत्वाची मोहीम फत्ते केल्यानंतर बाजीराव पुण्यात परतले. आता त्यांना फक्त पातशाहीपर्यंत मजल मारण्याची इच्छा होती. सगळ्यांचा मानसन्मान मोहीम झाल्यावर करण्यात आला. नानासाहेबांच्या लग्नात नाचलेली कलावंतीण मस्तानी ही कोथरूडच्या बागेत राहत होती. असामान्य सौंदर्य लाभलेल्या मस्तानीचा बाजीरावाच्या आयुष्यात प्रवेश झाला. हा ओघ हळूहळू वाढत गेला. एकीकडे राजपूत, जाट, बुंदेले, मुसलमान, रोहिलें अशा अनेक मातब्बरना धूळ चारून दौलतीत भर टाकत होते आणि एकीकडे मस्तानीत गुंतत चालले होते. त्यामुळे काशीबाईंची मनस्थिती ढासळत चालली होती. काही काळानंतर बाजीरावांनी मस्तानीसाठी महाल बांधून घेतला. तिथे मस्तानी वास्तव्यास आल्यानंतर पुण्यातील ब्राम्हण लोकांनी कोणतेही कार्य मनाई करण्यात आली होती. पुष्कळ प्रयत्नानंतर जवळच्या सहकाऱ्यांमूळे बाजीरावांना आणि मस्तानीला दूर करण्यात आलं. तिच्या महालावर चौकी बसवून मस्तानीला बंदिस्त करण्यात आलं. हे ऐकून बाजीरावाच मन मोहीमेत लागत नव्हतं आणि दिवसंदिवस त्यांची प्रकृती ढासळत गेलीं. पुढे काय झालं जाणुन घ्यायच असेल तर पुस्तक नक्की वाचा.
समर्पक लिखाण आणि देखणी लेखनशैली ???????? !
????
परकियावर आपल्या आक्रमक आणि निडर वृत्तीने अविरत सत्ता गाजवनारा एक अपराजित सेनानी, स्वकियांच्या प्रेमपोटी भावनिक आणि सामाजिक बंधनाने कसा पराभूत होतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजेच “राऊ”
– अक्षय गुधाटे: उत्तम समीक्षण
– संदिप सांगळे: यथायोग्य पूरक समीक्षण
या लिखाणाला सुद्धा तोड नाही.
हे वाचल्यानंतर राऊ ही कादंबरी लवकरच वाचून काढायची ओढ लागलिय आता .. धन्यवाद inside मराठी
Thanks ☺️