लेखक – डॉ. नरेंद्र जाधव
पृष्ठसंख्या – २९९
प्रकाशन – ग्रंथाली
मुल्यांकन – ४.९ | ५
प्रसिद्ध सिनेकलाकार निळू फुले म्हंटले होते.. “साने गुरूजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप !” असे रसिकांच्या हृदयावर राज्य केलेल्या या पुस्तकाचा मराठी साहित्यात एक मोलाचा सहभाग आहे. सामन्यांतील असामान्य मानवाची ही एक संघर्ष आणि धडपडीची गोष्ट आहे. अनेकांनी याबद्दल आधीच खूप काही सांगून आणि लिहून याची स्तुती केली आहे. पण तरीही हा माणूस त्याहून काही वेगळा आहे आणि तो अंश हे पुस्तक वाचल्याशिवाय समजणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अस्मिता जागृत झालेल्या कुटुंबाची आणि व्यक्तीची ही एक जगावेगळी संघर्षगाथा माणसाला जीवन दाखवते आणि शिकवते. १९व्या शतकात दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी आणि समाजकल्याणापर झटलेल्या बाबासाहेबाना बाप संबोधून लीहलेली आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांना साजेस काम करत आपले आयुष्य घडवतात. पुतळे पुजून नाही तर त्यांचे पुस्तकं वाचून त्यांचे विचार समजून त्यांना अंगी भिनवलेला हा माणूस अर्थशास्त्र तज्ज्ञ आहेच शिवाय याबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रात देखील अनेक वर्ष काम करून आपले मोलाचे योगदान बजावले आहे. गरीब घरात जन्म झाला असला तरी त्या गरिबीचा किंवा कोणत्याही कमतरतेचा कोठेही उच्चारही न घेता आपल्या कष्टाच्या, बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हे सारं त्यांचं विश्व निर्माण केलं आहे. त्यात अधिकतेचा आणि गर्वाचा लवलेशही नाही. अशी माणसे समजून घेताना आपसूकच प्रोत्साहन मिळते, जगण्याचा खरा अर्थ लागतो.
हे पुस्तक सगळ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवते त्यात येणाऱ्या अडचणी आणि वाटेवरील अडथळे यांच्याशी कसे दोन हात करावे हे शिकवते. आपले मीपण हरवून आपल्याला स्वतःच अस्तित्व शोधायला लावते. म्हणूनच आजपर्यंत या पुस्तकाच्या १९९ आवृती निघाल्या आहेत, २०हून अधिक भाषेत हे पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि कोरिया मध्ये तर ३०० हून अधिक आवृत्त्या आल्या आहेत. हे मराठीचे भाषेचे आणि साहित्याचे कौतुकच म्हणावे लागेल आणि ताकतच. पंजाबी साहित्य अकादमी पुरस्कारविजेते हे पुस्तक आपल्यासाठी मनाचं तुराच आहे. जुनी संस्कृती जुन्या परंपरा रूढी यात अडकलेल्या अनेक दलित मनांचा उध्दार करू शकेल अशा तकतीच हे लिखाण आणि आयुष्य आहे.
वसंत बापट या पुस्तकाबद्दल बोलताना म्हतले होते, ” मराठी भाषेच्या सात-आठशे वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम अशा पहिल्या पाच ग्रंथांमध्ये मी या पुस्तकाचा समावेश करीन. हे पुस्तक म्हणजे मराठी भाषेचे अक्षरलेणे आहे. घराघराच्या छतावर उभे राहून, साऱ्या जगाला ओरडून सांगावेसे वाटते; हे पुस्तक वाचा.” आणि आत्ता या घडीला मलाही तसेच वाटत आहे…. हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असावं असं मला वाटतं.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: