pruthvivar manus uparach marathi book cover

पृथ्वीवर माणूस उपराच!

पोस्ट शेयर करा:

लेखक – सुरेशचंद्र नाडकर्णी

प्रकाशन – मेहता प्रकाशन

मुल्यांकन – ४ | ५

जवळपास सर्वच धर्मग्रंथांमध्ये देव हे स्वर्गातुन विमानाने पृथ्वीवर येतात असे संदर्भ आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे संहारक शस्त्रे देखील होती.  याचाच अर्थ देवांकडे प्रगत तंत्रज्ञान असणार. आज मानवाला उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि पुराणांमध्ये वर्णलेली तंत्र बऱ्यापैकी मेळ खातात. लवकरच मानव इतर ग्रहांवर वस्ती करण्यास सक्षम होईल आणि परग्रहवासीयांच्या शोधात तर मानव आहेच. समजा मानवाने येत्या ५० वर्षात एखाद परग्रहीय जीवन शोधलं आणि तेथे तो स्पेसशिप घेऊन पोचला आणि ते परग्रहीय जीव आपल्यापेक्षा अप्रगत असले तर ते त्या घटनेचं वर्णन – “आकाशातुन विमान घेऊन येणारे देव ज्यांच्याकडे अफाट शक्ती आहे” असच करतील.

पृथ्वीवर माणूस उपराच हे मराठीत लिहिलेलं, ऐतिहासिक घटनांना एका वेगळ्या दृष्टीने बघण्यास प्रवृत्त करणार बंडखोर पुस्तक. एरीक डेनिकेन यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल त्यांच कौतुक करावं तितकं कमीच. पुस्तकाच्या नावातील “उपरा” शब्द इथे “बाहेरील” किंवा सरळ सरळ “परग्रहीय” म्हणून घेऊ शकतो.

लेखक प्राचीन काळातील घटनांना वेगळ्या दृष्टीने मांडतो जस कि १६व्या शतकातील पिरि रिस चे नकाशांमध्ये उत्तर-दक्षिण अमेरिकेचा भाग खूपच लांबलचक रेखाटण्यात आला आहे. जेव्हा कैरो शहर मध्यबिंदू धरून अडीचशे मैल उंचीवरील उपग्रहातून पृथ्वीचे छायाचित्र काढले ते पिरि रिस च्या नकाशांशी तंतोतंत जुळले. त्या छायाचित्रात अमेरिकेचा आकार लांबलचक आढळून येतो. आता प्रश्न आहे की १६व्या शतकात पृथ्वीपासून अडीचशे मैल उंचीवरून हा नकाशा बनवणे शक्य नसताना हा नकाशा कसा बनवला गेला?

तसेच इंका संस्कृतीचे रस्ते उंचीवरून बघितल्यास आपल्याला विमानांसाठी रनवे असल्याचा भास होतो. असे एक ना अनेक संदर्भ आपल्याला विचार करायला भाग पाडतात. खरंच मानवी उत्पती आपल्याला माहित असलेल्या परिघाच्या बाहेरील आणि न उलघडलेलं गूढ आहे.

pruthvivar manus uprach sureshchandra nadkarni mehta akash jadhav


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]



संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

1 Comment

  • पृथ्वीवर माणूस उपरा हे पुस्तक Eric von Daniken या conspiracy theory मांडणाऱ्या लेखकाच्या पुस्तकांची मराठी रूपांतर आहे. मुळातच Daniken च्या theries ह्या छद्म-वैज्ञानिक (Pseudoscientific) आहेत. त्यामुळे त्यांवर आधारित “पृथ्वीवर माणूस उपरा” हे पुस्तक सुद्धा छद्म- वैज्ञानिक ठरते, त्याला बंडखोर साहित्य म्हणता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *