vaman parat n aala marathi book cover

वामन परत न आला

पोस्ट शेयर करा:

लेखक – जयंत नारळीकर

पृष्ठसंख्या – १३३

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

मुल्यांकन – ४.३ | ५

मराठी भाषा ही सर्व प्रकारे समृध्द आहे, यालाच एक पूरक अशी पावती देत एक अत्यंत हुशार आणि नावाजलेले वैज्ञानिक जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी भाषेला दिलेली काल्पनिक आणि विज्ञानासंबंधीची पुस्तके वाचणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. त्यांच्या या कार्याची मोल मराठी साहित्यात खूप अधिक आहे. मराठी साहित्यात अनेक प्रकार खूप मजबूत पणे हाताळले गेले आहेत त्यात विज्ञान आधारित लिखाण जरा कमीच पण ती कमी आपल्या मुक्त आणि विशिष्ट शैलीने डॉ. नारळीकर यांनी भरून काढली अस म्हणता येईल.

पुस्तक काल्पनिक असल्यामुळे त्याचा आणि त्यातील पात्रांचा मेळ हे आजच्या वास्तववादी जगाशी मिळता जुळता असणे हा एक मोठा प्रश्न असतो, पण नारळीकरांनी मात्र त्यातील साऱ्या विविध गोष्टींची काळजी घेऊन हे काम उल्लेखनीय आणि उच्चप्रतीने पूर्ण केले आहे अस म्हणावं वाटतं.

एकंदर बदलत्या कृत्रिम जगात वावरत असतानाची ही गोष्ट आहे. त्यातच मानवजातीच्या वाढत्या आशा अपेक्षा आणि त्यातच वावरत असताना एक कृत्रिम रोबोट ही गोष्ट पुढे नेतो. रोबोट सोबत पुढे जाणारी गोष्ट अनेक वळणं घेत पुस्तकातील अनेक रहस्यं उलघडत जाते त्याचसोबत त्यातली मजाही हळू हळू वाढत जाते. वाढत्या कृत्रिमतेचा भाव, आभाव, परिणाम, दुष्परिणाम या साऱ्यांनी तयार केलेले कुतूहल नक्कीच पुस्तकात गुंतवून ठेवते. विज्ञानाचा पाया आधीच भक्कम असल्यामुळे यातील अनेक गोष्टी काल्पनिक असूनदेखील खरच असल्याचा अनुभव देऊन जातात, त्यातील विनोदवादी विरंगुळा ही कायम राहतो. यामुळेच या पुस्तकातील थोडी अजून काहीतरी ची मजा टिकून राहते.

मराठीतील हा एक वेगळा लिखाण प्रकार हाताळताना लेखकाची लेखणी वेगळी छाप सोडून जाते. नारळीकरांणी हाताळलेल्या पात्रांवर मानवाच्या स्वभावाचा तर आहेच परंतु, विज्ञानयुगात घडू शकतात अशा विविध घटांनाचा एक नकळत आणि अनपेक्षित असा प्रभाव आपल्याला मोहून टाकेल यात शंका नाही. हे सारं एका पुस्तकात जुळवून आणणं आणि त्यातील मूळ गाभा तसाच ठेऊन ते रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी लेखकाने घेतलेले कष्ट आणि त्याची मेहनत दिसून येते. सारी इत्यंभूत माहिती आपल्याला नारळीकरांचे अजून पुस्तक कोणते याचा शोध घ्यायला भाग पाडतील.

vaman parat jayant narlikar mouj akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/1783/waman-parat-na-ala—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]




संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *