लेखक – हार्पर ली
प्रकाशन – एरो बुक्स
मूल्यांकन : ४.३ |५
” तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सगळ्या ब्ल्यू जे ना मारू शकता , पण लक्षात ठेवा, मॉकिंगबर्ड ला मारण हे घोर पाप आहे.”
एटिकस फिंच नावाच्या वकिलाने आपल्या मुलांना दिलेला हा सल्ला, १९३० च्या दशकातील दक्षिण अमेरिकेतील वंशभेदाचे दारुण सत्य कथन करतो. जगातील सर्वोत्तम पुस्तकांच्या यादीत गणल्या जाणाऱ्या या पुस्तकाची कथा ” एका कृष्णवर्णीय व्यक्तीने एका श्वेतवर्णीय महिलेवर केलेल्या बलात्काराचा खोटा आरोप, आणि एटिकस ने त्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष याभोवती गुंफलेली आहे. ही कथा वाचक, एटिकस ची लहान मुलगी स्कॉट फिंच हिच्या दृष्टिने वाचतो. हार्पर ली यांच्या अतिशय सुलभ अशा लेखनामुळे कथेतील पात्रे जसे की स्कॉट, जेम्स, कॅलपरनिया, बू रेडली, समर डिल जणू काही आपल्या जीवाभावाची वाटतात.काहीसं वात्रट वाटणारं समर डील हे पात्र विशेष भाव खाऊन जात.
पूर्ण जगभरात नावाजले गेलेले हे पुस्तक मानाच्या पुलित्जर सन्मानाने गौरवले गेले आहे. त्याचप्रमाणे १९६० मध्ये प्रकाशित झाल्यापासून ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद झालेले आहे. या पुस्तकावर आधारित हॉलीवुड पटही फार गाजलेला आहे .असे हे पुस्तक वाचणे म्हणजे मराठी वाचकांसाठी खास पर्वणी आहे.
हार्पर ली यांचा जन्म १९२६ मध्ये अलाबामातील मनारोविल्लतला. मोकिंग बर्ड ला मिळालेल्या यशानंतर सुद्धा हार्पर ली यांनी दुसरे कोणतेही लिखाण केले नाही, त्याचप्रमाणे त्यांनी मुलाखतीस नकार दिला परंतु तरीही या पुस्तकातील त्यांच्या लिखाणाला असणारी धार काही कमी होत नाही. त्यांच्या लेखनातून स्त्री-पुरुष समानता, वंशभेद त्याचप्रमाणे लहान मुलांचे भावविश्व अगदी उत्तम रित्या साकारण्यात आलेले आहे आणि या सर्व गोष्टी एकाच पुस्तकात मांडण्याचे कौशल्य त्यांनी दाखवून दिले आहे. लहानग्यांच्या भन्नाट कल्पना वाचकाला जणू स्वतःची बालपणच आठवून देतात. त्याच बरोबर बू रेडली, स्कॉट आणि तिच्या मित्रांच्या नजरेत एक रहस्यमय मनुष्य आहे, त्याच्याबद्दल वाचताना फार मजा येते. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वाचावे वाचावे असे हे पुस्तक आहे.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: