brief answers to big questions marathi review cover

ब्रीफ आंसर टू द बिग क्वेश्चन्स

पोस्ट शेयर करा:

लेखक – स्टीफन हॉकिंग

पृष्ठसंख्या – २७२

मूल्यांकन ४.४ | ५

आजकालच्या जगात स्टीफन हॉकिंग यांचे नाव कोणी ऐकले नसेल तर नवलच. स्टीफन हॉकिंग म्हटलं की आपल्यासमोर येतो एका व्हीलचेअर वर बसलेला, समोर कॉम्प्युटर आणि क्वांटम मेकॅनिक्स, ब्लॅक होल यांसारख्या संकल्पनां मध्ये स्वतःला पुरेपूर वाहून घेणारा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. पण हीच त्यांची एक बाजू नाही… वैज्ञानिक जगतात जितक्या आदराने हॉकिंग यांचे नाव घेतले जाते तितक्याच आदराने साहित्य क्षेत्रातही ते घेतले जाते. आणि त्यांचे योगदान मोलाचे आणि पुढच्या पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शनकराक ठरेल.

 त्यांनी “द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम”, “थेरी ऑफ एवरीथिंग” यांसारखी बेस्ट सेलर पुस्तक आपल्याला दिलेली आहेत. नावांवरून जरी किचकट वाटली तरीही ही पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचायला हाती घ्याल, तेव्हा त्यांच्यातील लेखकाचे “अगदी अवघड गोष्ट सोपे करून सांगणारा शिक्षक दिसून येतो.जरी तुम्हाला वैज्ञानिक पार्श्वभूमी  नसली तरीही, हे पुस्तक वाचताना ब्रम्हांड म्हणजे काय ?? एलियन्स आहेत की नाही ?? देव आहे की नाही ?? या सारख्या मानवाला अगदी पूर्वापारपासून पडत आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे, तुम्हाला नक्कीच मिळतिल. या सर्व विषयांचा एका नवीन दृष्टीने विचार करू लागाल. नवीन दृष्टिकोन मिळेल एक लोलक हाती लागेल.

हे पुस्तक स्टीफन हॉकिंग यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले आहे, त्यामुळे काही काही गोष्टी वादग्रस्त वाटल्या तरीसुद्धा  तुमची उत्सुकता ताणली जाणार आहे, हे मात्र निश्चित! आणि हो… देव वैगेरे अशा गोष्टींचा समाजाच्या मनावर असणाऱ्या कल्पनांना धक्का दिल्याशिवाय हे पुस्तक राहत नाही. आणि ते पटवूनही दाखवते ही या पुस्तकाची खासियत आहे.

 त्यामुळे ज्यांना विज्ञानामध्ये रुची आहे किंवा ब्रम्हांड वैगेरे यांच्याबद्दल जिज्ञासा आहे त्यांनी ” ब्रीफ आंसर टू बिग क्वेश्चन्स” नक्कीच वाचावे असे मला मनोमन वाटते.

stephen hawking science brief answers big questions renuka salve jhon murray


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:






संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

रेणुका साळवे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *