who will cry when you die marathi book review cover

तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?

पोस्ट शेयर करा:

लेखक  – रॉबिन शर्मा

पृष्ठसंख्या – २२५

प्रकाशन – जयको

मुल्यांकन – ४.२ । ५

“तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?” थोडं नकारात्मकतेकडे झुकलेल शीर्षक  वाचून गोंधळून जाणे साहजिकच आहे. पण हे पुस्तक प्रत्येक शब्दागणिक साकारात्मकता आणि प्रत्येक वाक्यागणिक रचनात्मक सौन्दर्यतेचा अनुभव देत. जगप्रसिद्ध लेखक आणि बिझनेस कोच, रॉबिन शर्मा लिखित “हू विल क्राय व्हेन यू डाय?” या पुस्तकाचा मराठी अनुवाद देखील तितकाच वाचनीय झाला आहे.

या पुस्तकातील १०१ प्रकरणं म्हणजे जीवन योग्य आणि आनंदाने जगण्याचे धडे. प्रत्येक प्रकरण जवळपास  १-२ पानांत संपत त्यामुळे पुस्तक वाचताना उत्सुकता वाढत जाते. पुस्तकात अलंकारिक शब्दांचा भरणा आहे, छोट्या गोष्टी आहेत, अनुभव आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सकारात्मकता आहे.

पुस्तक वाचताना लेखक रॉबिन शर्मा यांच्या विनम्रतेचा अनुभव येतो. पुस्तकाची भाषा आपल्याला खिळवून ठेवते आणि नकळतपणे मानवता शिकवते. एखाद्या व्यक्तीला भेट देण्यासाठी तर हे पुस्तक अगदी योग्य आहे. त्याशिवाय पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक जरूर वाचायला द्या. या पुस्तकामुळे त्यांना वैश्विक मूल्य आणि मानवता यांबद्दल जाणीव होईल.

robin sharma who will cry when you die jaico akash jadhav


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/7291/tumachya-mrutunantar-kon-radnar-ahe-robin-sharma-jaico-books-buy-marathi-books-online-at-majesticreaders-9788179926949″]इंग्रजी आवृत्ती


संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

आकाश जाधव

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *