the-perks-of-being-a-wallflower-book-review-in-marathi

द पर्क्स ऑफ बीईंग अ वॉलफ्लावर

पोस्ट शेयर करा:

लेखक – स्टिफन शबॉस्की

समीक्षक – गुंजन

प्रकाशन – सायमन अँड शुस्टर

पृष्ठसंख्या – २२४

मूल्यांकन – ४/५

ह्या कथेशी ओळख झाली ती ह्याच पुस्तकावर आधारित सिनेमातून. अर्थात सिनेमाला वेळेचं बंधन असल्याने पुस्तकाइतकं स्वातंत्र्य मिळत नसलं, तरीही त्यात कथेचा आत्मा अखंड जपला आहे. ही कथा आहे चार्लीची, त्याच्या शब्दात आणि फक्त त्याच्याच दृष्टिकोनातून. हीच मांडणी वॉलफ्लावरला एक वेगळी ओळख देते. चार्लीचं विश्व उलगडतं ते त्याने लिहिलेल्या पत्रातून. एका अज्ञात व्यक्तीला लिहिली गेलेली पत्र, जणू आपल्याचसाठी आहेत असं वाटल्याखेरीज राहत नाही. कदाचित म्हणूनच आपण नकळत त्याच्या जगाचा एक अविभाज्य भाग बनतो आणि तो आपल्या. 

लेखकाला चार्ली हा एखाद्या वॉलफ्लावर सारखा वाटतो. अशा व्यक्ती ज्या भर गर्दीत अलिप्त असतात आणि त्यांच्या त्या अलिप्त कोपऱ्यातून जग न्ह्याळतात, लोकांना जाणून घेतात, त्यांना समजून घेतात.  ह्या पत्रातून आपण चार्लीला तर भेटतोच पण ह्या व्यतिरिक्त अनेक पात्रांना भेटतो, ज्यांनी कळत नकळत चार्लीच्या आयुष्याला आकार दिला आहे. सॅम, तिचा सावत्र भाऊ पॅट्रिक, चार्लीचे शिक्षक बिल आणि चार्लीची मावशी ही पात्र चार्ली इतकीच घर करून जातात. 

हायस्कूल म्हणजे अमेरिकन शालेय जीवनातला एक महत्त्वाचा काळ. चार्लीच्या कथेतील ह्या नवीन आणि महत्त्वाच्या वळणावर तो एकटाच आहे कारण त्याच्या जिवलग मित्राने काहीही कारण पाठी न सोडता आत्महत्या केली असते. आधीच नाजूक मन:स्थिती असलेल्या चार्लीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. लेखक स्टिफन शबॉस्की ह्यांची लेखन शैली इतकी नितळ आणि प्रभावी आहे की चार्लीची मन:स्थिती, निराशा, भावनिक गुंतागुंत आणि त्याचा अंतर्मनाचे खेळ अगदी कुशलतेने हाताळले गेले आहेत. कोणत्याही टप्प्यावर तुम्ही कथेशी विलग होत नाही.

ह्या कथेतून लेखकाने प्रेम, मैत्री, नातेसंबंध, कुटुंब, बालपणाचा आपल्या आयुष्यावर पडणारा प्रभाव आणि अंतर्मनाचे अस्पृश्य कोपरे ह्यांवर भाष्य केलं आहे. प्रेमाविषयी बोलताना लेखक म्हणतो की, ‘we accept the love we think we deserve’, आपण तेच प्रेम स्वीकारतो ज्या प्रेमायोग्या आपण स्वतःला समजतो. अशाच अनेक सोप्या वाक्यरचानांतून खोल असं काही लेखक मांडतो, जे चार्ली इतकंच आपल्या आयुष्यालाही लागू पडतं. 

ही कथा म्हणजे दुसऱ्याची रोजनिशी वाचण्यासारखं आहे. तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ह्यात मिळतील आणि जाणवेल की आपण सगळेच सारख्याच प्रश्नांमध्ये गुंतलो आहोत. चार्लीच्या आयुष्यात एकदा डोकावून पहा, काहीच नाही तर एक आरसा नक्कीच सापडेल!

समीक्षक – गुंजन

stephen chbosky perks being wallflower gunjan simon schuster


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
संबंधित व्हिडिओ

पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *