heidi-book-review-in-marathi

हैदी

पोस्ट शेयर करा:

लेखिका – जोहाना स्पायरी

पृष्ठसंख्या –  १००

मूल्यांकन – ४.५ | ५

मी अगदी १३-१४ वर्षांची असताना शाळेच्या लायब्ररीतून घेऊन वाचलेलं हे पुस्तक. १८८० च्या कालखंडात प्रकाशित झालेले हे  त्याकाळच्या युरोप चे दर्शन घडवते. कथा आहे एका अनाथ मुलीची ‘हैदीची’… हैदी म्हणजे एखादं नाजुक फुलपाखराप्रमाणे दिसणारी होत पोर. या पुस्तकात स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतातील निसर्गरम्य वातावरणाची प्रचिती आपल्याला टवटवी देत राहते. मी तर आयुष्यात एकदा तरी तिथे जाऊन येईन असं ठरवून टाकलं आहे. इतकी सुंदर ही जागा आणि तीच वर्णन. ही पुस्तकाची जमेची बाजू.

जोहांना स्पायरी यांनी या पुस्तकात साकारलेली हैदी, आपल्याला आजोबा आणि नात यांच्यातील प्रेमळ नात्यातला गोडवा दाखवते. त्याचप्रमाणे, दुःखाने झाकोळलेल्या मनावर उपचार करणारा अगदी फुकट चा डॉक्टर म्हणजे …निसर्ग! हेही इथे समजते. काहीसा रागीट आणि काहीसा अलिप्त आजोबा आणि दुसरीकडे सुंदर डोंगर निसर्गरम्य वातावरण यांच्यात राहणारी हैदी यांचा हेवा वाटतं राहतो.

स्वतःच्या वैयक्तिक जीवनात दुःखाचा डोंगर कोसळला असताना जोहांना यांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजे शब्दात मांडता न येणारे आहे. त्यांच्या या पुस्तका वर अगदी हॉलीवुड आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा (दों फूल) सिनेमा निर्मिती झालेली आहे. ही कथा आपल्याला लहान मुलांचे अंतरंग सहजरित्या उलगडून दाखवते. इतक्या वर्षानंतरही मला स्वतःला हे पुस्तक परत एकदा वाचायला नक्की आवडेल.

आणि हो..पुस्तक वाचून झाल्यावर डोळ्यांच्या कडा पाणावल्या जातील मनात केविलवाणे रूप तरळत राहील !! आणि “नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे” असं पु .लं.का म्हणतात ते न सांगताच उमगतं. त्यामुळे वेळ काढून वाचा, जोहाना स्पायरी यांचं… हैदी.

heidi johana spyri renuka salve


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

रेणुका साळवे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *