लेखिका – सवि शर्मा
प्रकाशन – वेस्टलँड
पृष्ठसंख्या – २६३
मूल्यांकन – ४ | ५
पहिल्या भागात लेखिकेने सर्वांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता अजून टांगून ठेवली आहे आणि या पुस्तकाची सुरुवात अगदी सुंदररित्या केली आहे. विवान, मीरा, निशा आणि कबीर यांच्या आनंदात व्यतीत होणाऱ्या जीवनात, लहान मुलीचा जन्म आणि तिच्या येण्याने झालेला बदल, कहाणीची रुपरेषा बदलते. आणि पुन्हा सर्वजण आपापल्या स्वप्नांच्या पाठलागात व्यस्त होतात.
मीरा ही आपल्या दुसऱ्या पुस्तकाच्या पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असते. आणि तिला आपलं पुस्तक प्रकाशित करण्यसाठी एका फेस्ट मधे संधी मिळते. मग ती त्या सोहळ्यासाठी रवना होते. अचानक कबीरच्या कॅफे मध्ये आग लागते. त्यात त्यात कबीर ची दुखापत. निशाला बसलेला धक्का. मिराचा होणारा सतत संपर्क, आणि तिची झालेली धावपळ त्यातून उलगडणारी कथा रहस्याचा खजाना आहे.
क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने आणि परिस्थितीमूळे, प्रत्येक पात्रावर पडलेल्या प्रभावाने एक वेगळाच गोंधळ निर्माण होतो. पैसे, ड्रग्स, कॅफे, हॉस्पिटल आणि घर यात गुंतून गेलेल्या लोकांची ही कहाणी. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा चाललेला युक्तिवाद, त्यांचा संवाद आणि त्यांचे प्रासंगिक विधानं, तुम्हाला हे पुस्तक वाचायला भाग पाडतील. राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे हे चौघेही पुन्हा उभे राहू शकतील का ?? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचा. मी खात्री देतो तुम्हाला नक्की आवडेल.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ