लेखक – सवि शर्मा
प्रकाशन – वेस्टलँड
अनुवाद – डॉ. अनघा केसकर
पृष्ठसंख्या – १८४
आयुष्याचा खेळ खेळताना पहिल्या काही सोंगट्या चुकीच्या पडल्या, म्हणून काही संपूर्ण खेळ चुकीचा होत नाही किंवा आपण हरलो असेही होत नाही. उलट त्याच सोंगट्या आपल्या आयुष्याला नावा अर्थ देऊन जातात. मला हे पुस्तक म्हणजे तंतोतंत अशीच काहीशी कहाणी वाटते. पहिल्यांदी जराशी हळू आणि नीरस वाटणारी गोष्ट नंतर मात्र अतिशय सुंदर वळण घेऊन एक वेगळीच मजा तुम्हाला देते. विवान, मीरा, निशा आणि कबीर हे चार पात्र या कथेची अविभाज्य घटक आहेत. या गोष्टी मध्ये प्रत्येकाला आपलं स्वतंत्र रूप आहे. प्रत्येकाची वेगळी खटपट आहे आणि त्यांचे वेगळे रंग, ढंग यात लपले आहेत. मीराला लेखक बनयाच असत… कबीरला कॅफे टाकायचं असतं… निशाला आपल्या जोडीदार बद्दल सुखी आयुष्याची स्वप्न रंगवायची असतात…
पण अचानक घटनांची उलटापालट होते वेगवेगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मी विस्कटलेल्या गोष्टींची ही कथा तुम्हाला प्रत्येक पात्रात गुंतवत जाते. हे चारही पात्र एकमेकात वेगवेगळ्या प्रकारे अडकली जातात. त्यांच्यातील गुंता आणि त्यातील काही गोष्टी प्रत्येकाच्या स्वभावाने अगदी खुलून येतात आणि पुस्तकाला नवं रूप देतात.
लेखिकेने घातलेली पात्रांची सांगड तुम्हाला हवीहवीशी वाटायला लागते आणि पुस्तक संपते. अनेकांना याचा दुसरा भाग हवा होता तोही लवकरच उपलब्ध झाला आहे. लेखिकेचे उत्तम लिखाण तुम्हाला मारून टाकेल. हे पुस्तक तुम्हाला आवडेलच पण तुम्ही याचा पुढचा भागही नक्कीच खरेदी कराल असे मला वाटते.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ