लेखक – रिचर्ड बाक
अनुवाद – बाबा भांड
पृष्ठसंख्या – १४४
प्रकाशन – साकेत प्रकाशन
मुल्यांकन – ४.८ | ५
हे पुस्तक जरी छोट असलं तरी खुपकाही गोष्टी शिकवून जातात. रीचर्ड बॅच यांनी ‘Short but Sweet’ या युक्तीचा पुरेपूर वापर या पुस्तकात केलेला आहे. लेखकाने या पुस्तकात सगळ्यांपेक्षा वेगळा असणाऱ्या एका सीगल ची गोष्ट सांगितली आहे. त्यातून आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी मिळून जाते.
सीगल’सना फक्त आपल्याला अन्न कसं मिळवता येईल ? हा एकच प्रश्न असतो. पण जोनाथनला फक्त उडायला आवडत असे. तो नेहमी उडण्याचा सराव करी. त्याच आपल्या उडण्यावर खूप प्रेम होतं म्हणून तो नाविन्यपूर्ण योजना करीत असे. पण सर्वांच्या वडिलांना वाटतं तसंच त्याच्याही वडिलांना वाटत होतं की, उडण्याखेरिज हा काही करू शकत नाही. जोनाथन ने बाकीच्या सारखं करावं. मग तो त्यांच्या विरोधात न जाण्याचा ठरवून सर्वांबरोबर जातो. पण तिथे त्याच मन नाही लागतं. तो पुन्हा उडण्याचा सराव करू लागतो आणि पाण्यात पडतो. त्याला वाटू लागतं की आपण खूप मोठा अपयशी आहे . आपण ‘फाल्कन’ पक्ष्यासारख नाही उडू शकत. आपण आपलं अन्न शोधावं फक्त असे नकारात्मक विचार येऊ लागतात. घरी परतत असताना त्याला एक कल्पना सुचते की आपण फाल्कन सारखी पंखांची हालचाल केली तर आपण चांगला वेग धरू शकतो. आणि तिथे त्याच आयुष्य बदलते.
तो पुन्हा जोमाने २००० फुटावरून पंख पसरवून मोठी उड्डाण घेतो. त्याचा वेग १२० , १४० असा वेग वाढत जातो समुद्राजवळ गेल्यावर स्वतःला सांभाळून तो एक आत्मविश्वास प्राप्त करतो. मग तो नकारात्मक गोष्टी विसरून पुन्हा उडत राहण्याचा निश्चय करतो. एकदा तो ५००० फुटावरून उड्डाण करतो अचानक मध्ये सीगल’स चा समुदाय मधे येतो. कुणालाही इजा होत नाही पण त्याला मात्र वाळीत टाकलं जात. तो तिथून निघाल्यावर उडत असताना त्याच्याभोवती अजुन दोन सीगल’स उडत असतात. तेव्हा तो त्यांना विचारतो तुम्ही कोण आहात ? तेव्हा ते बोलतात आम्ही तुझे भाऊ आहोत. तू इथे खूप काही शिकला आता तुझी स्वर्गात जाण्याची वेळ आली आहे.
तो स्वर्गात गेल्यावर झालेला शारीरिक बदल, मानसिक बदल तुम्हाला हैराण करेल. तिथे मिळालेल्या चियांग आणि फाल्कन ची गोष्ट काही निराळीच मजा आणि तत्वज्ञान खुलं करून जाते. “स्वर्गासारखी कोणतीही जागा नसते, स्वर्ग आपल्यामध्येच असतो. जो चांगला बनण्याच्या मागे लागलेला असतो, तोच चांगला बनू शकतो”. यासारख्या अनेक मनाचा ठाव घेणारी वाक्य तुम्हाला जीवन शिकवतील.
आपल्या इवल्याश्या गोष्टीचा किती छान परिणाम होऊ शकतो, हे पुस्तक त्याचेच उदाहरण आहे असे वाटते. मनाच्या सर्व भावना इथे लेखकाने हाताळल्या आहेत आणि त्यातूनच विचारांच विश्व तयार केलं आहे. नवीन विषय आणि त्याची व्याप्तीच हे पाल्हाळ मनाला भुरळ घालते.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
इंग्रजी आवृत्ती
संबंधित व्हिडिओ