संपादन – मंगला आठलेकर
पृष्ठसंख्या – १८८
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
मूल्यांकन – ४ | ५
‘तिची कथा’ म्हणजे नक्की कोणा एकट्या स्त्री ची नव्हे तर जगभरात विविध रूपात, वेशात, क्षेत्रात वावरणाऱ्या त्या प्रत्येक स्त्री ची. मी ११-१२वी मध्ये असताना हे पुस्तक वाचलं आणि अशाही गोष्टी असू शकतात हे मला तेव्हा जाणवलं. ११ कथा, ११ वेगवेगळ्या स्त्रिया हे समीकरण असलेलं हे एक सुंदर पुस्तक. ११ लेखक माफ करा ‘लेखिका’ ह्यांनी ह्या कथा मांडल्या आहेत आणि एक स्त्री एका स्त्री च्या भावना समजू शकते हे यातून चांगलंच सिद्ध होत.
एक स्त्री तिच्या कठीण काळात सर्वात शक्तिशाली असते याची काही पौराणिक उदाहरणं आपल्याकडे आहेतच दुर्गा माता, महिषासुरमर्दिनी इ. पण त्याची आधुनिक मांडणी या पुस्तकात आहे. शिकलेल्या वा अशिक्षित, लग्न झालेल्या वा विधवा, लहान किंवा मोठ्या अशा सर्व स्त्रियांचा संघर्षाच्या गोष्टी यात प्रखरतेने मांडल्या आहेत.
संघर्ष म्हणलं कि अगदी युद्ध वगैरे नाही तर रोजच्या जीवनातला संघर्ष जो प्रत्येक स्त्री ला आज २१ व्या शतकात सुद्धा करावा लागतो. कोणाला काही सिद्ध कारायच म्हणून नाही, तर नुसतं साधं जीवन जगायचं म्हणून देखील. कदाचित यातल्या काही गोष्टी “आणि शेवट गोड होतो” ह्या पठडीतल्या नाहीत. म्हणून देखील हे पुस्तक उमेद ढासळवणारं, नसून जिद्द वाढवणारं आहे. प्रत्येक गोष्टीची जमेची बाजू मुख्य पात्र साकारलेली स्त्री आहे आणि त्या प्रेत्येकीकडून आपण काहींना काही शिकतो.
नेहेमीच आवाज चढवून आणि उठवून बोलनं किंवा कसे पुरुष कमकुवत आहेत किंवा आपण च कशा श्रेष्ठ म्हटल कि त्याला ‘स्त्री – स्वाभिमान’ म्हणत नाहीत. कित्येक वेळा न बोलता सुद्धा स्त्री ला आपली बाजू व्यवस्थीत मांडता येते, किंवा आपल्या कृतीतून ती जगासमोर येते. हा एक मोठा संदेश हे पुस्तक नकळत देऊन जातं. यात श्रीमंत स्त्री ची कथा आहे, गरीब मुलीची आहे, एका आईची आहे, एका बायकोची आहे, एका प्रेयसीची आहे, एका मैत्रिणीची आहे आणि म्हणूनच आपल्यातली प्रत्येक स्त्री कुठेना कुठे एखाद्या पात्राशी सहमत होते एकरूप होते. शिक्षण झालं, लग्न झालं, मुलं झाली, त्यांची लग्न झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नसतं हे मी खूप छान प्रकारे यातून शिकले.
“स्त्री ला स्त्रीच समजू शकते”, म्हणून इतर कोणी तिला समजूनच घेत नाही असं नाही. आणि म्हणूनच यात काही गोष्टींमध्ये एक मित्र, एक नवरा, एक वडील, एक भाऊ कसे त्या नायिकांची जमेची बाजू असतात, हे देखील तितकच छान दाखवलेलं आहे. मुलांनी सुद्धा हे पुस्तक वाचल्यास, आपण आपल्या आयुष्यातील अनेक स्त्रियांविषयी कसा विचार करतो?? तो योग्य आहे का?? ह्याची एक उजळणी होण्यासारखे आहे. खूप वेळा आपल्याला मनातलं बोलायचं असतं, पण परिस्थिती माणसाला तसं बोलू देत नाही. आणि म्हणूनच अश्याप्रकारच्या पुस्तांकांचा आधार घेऊन आमापण ते जगासमोर मांडू शकतो. मी वाचून माझ्या विचारात एक स्त्री म्हणून, एक माणूस खूप बदल झाले तुम्हीही वाचा म्हणजे तुमच्याही आयुष्यात एक सुखद बदल व्हायला, वेळ लागणार नाही. मी नक्की सांगू शकते!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: