लेखक – लिली सिंग
पृष्ठसंख्या – ३११
प्रकाशन – पेंग्विन पब्लिकेशन
मुल्यांकन – ५ | ५
“DEDICATED TO THE PERSON
I WAS SIX YEARS AGO.
I TOLD U TO KEEP GOING.
THANKS FOR LISTENING.”
असं म्हणून पुस्तकाची सुरुवात करणारी लिली सिंग पहिल्या पानापासूनच आपलं मन जिंकायला सुरुवात करते.
काय बोलू मी ह्या पुस्तकाबद्दल?
Simply MUST MUST MUST READ BOOK!
तुम्ही इतर कोणतीही इंग्रजी पुस्तकं वाचली नसतील तरी हे पुस्तक मात्र नक्की वाचा. बाकी ह्या पुस्तकाबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे.
नावातल्या वेगळेपणा पासून ते पुस्तक लिहिण्याची पद्धत, पुस्तकाची मांडणी, त्यातले तिचे फोटोज् आणि एवढंच काय पुस्तक लाँच करताना पुस्तकाच्या ट्रेलरपर्यंत केलेल्या ह्या प्रत्येक गोष्टीत लिलीने तिचं वेगळेपण जपलं आहे आणि म्हणूनच मी खूप आत्मविश्वासाने म्हणेन की मी आजपर्यंत वाचलेलं हे सर्वात चांगलं सेल्फ हेल्प पुस्तक आहे.
आजच्या पिढीला लिली सिंग( AKA SUPERWOMAN) नवीन नाही पण ज्यांना ती माहित नाही त्यांना सांगायचं झालं तर लिली एक प्रचंड सक्सेसफुल यूट्यूबर आहे जीचे जवळ जवळ १५ मिलियन फॉलोअरस आहेत तसेच ती एक अभिनेत्री, रॅपर, नृत्यांगना, एका प्रसिद्ध कार्यक्रमाची सूत्रसंचालक आणि अर्थातच अता एक लेखक सुध्दा आहे. एके काळी नैराश्याने ग्रासलेली लिली स्वतःला त्यातून नुसतच बाहेर काढत नाही तर स्वतः च्या आयुष्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते आणि ह्याच तिच्या संघर्षाचं फलित म्हणून की काय ती फोर्ब्स सारख्या मासिकात ‘World’s Highest Paid You Tube Stars’ म्हणून विराजमान होते.
लिलीने हे पुस्तक 4 भागात आणि ५० प्रकरणांमध्ये विभागले आहे आणि प्रत्येक भगानंतर तिने “out of the blue” असा एक भाग दिला आहे ज्यात एका पानापर ती नैराश्यात असताना तिच्या मनात काय विचार होते आणि आत्ताच्या तिच्या आयुष्याच्या या टप्प्यावर तिच्या मनात कोणते विचार आहेत असं लिहिलं आहे आणि ते वाचून आपल्याला कळत की, बॉस त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत यायला एक वेगळ्याच प्रकारचे धैर्य लागते आणि म्हणूनच अगणित सेल्फ हेल्प व्हिडिओज आणि पुस्तकं पाहून व वाचून कंटाळलेले असूनही आपण हे पुस्तक आनंदाने शेवटपर्यंत वाचतो.
पुस्तकाचे हायलाईटस:
1.प्रत्येक प्रकरण 3 पनांपेक्षा जास्त नाही
2.प्रत्येक प्रकरणानंतर संपूर्ण पानभरून त्या प्रकरणातलं महत्त्वाचं वाक्य लिहिलं आहे ( जे खरोखर फाडून त्याची फ्रेम करून भिंतीवर लावावं वाटतं)
3.बऱ्याच प्रकरणानंतर कधी छोटी एक्सरसाई दिली आहे तर कधी आपल्यालाच प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली आहे( जे पुस्तकाला आणखीन इंटरअक्टिव बनवतं)
4. पुर्ण पुस्तकात लीलीचे तिच्या खऱ्या आयुष्यातले अनुभव आहेत त्यामुळे तिने सांगितलेल्या गोष्टी व्यवहारात आचरणात येऊ शकतात असं वाटतं (ज्यामुळे पुस्तक आणखीन खात्रीलायक वाटतं)
5. पुस्तकात खूप लिहून ठेवण्यासारखे वाक्य आहेत (पण ते लिहून ठेवायची आजिबात हिम्मत करू नका फक्त पेन्सिल आणि हायलायटर घ्या आणि त्यांना त्यांचं काम करू द्या.) तुम्ही जर लिहायला लागलात तर तुम्हाला वाचक सोडून लेखक झाल्याची भावना येईल हे नक्की ????.
6.तुम्ही कोणत्याही मूड मध्ये असलात तरी पटकन ह्या पुस्तकाशी कनेक्ट होऊ शकताल अशी एक वेगळीच ऊर्जा ह्या पुस्तकात आहे.
मी आधी म्हटलं तसं ह्या पुस्तकाबद्दल सांगण्यासारखं आणि लिहिण्यासारखं खूप काही आहे पण इथे इतकं नाही लिहू शकत. फक्त शेवटी मला लिली म्हणते ते सांगावसं वाटतं की,
“Trust your heart and use your power.
It’s never too late to fight for your life even if it’s against of your own shadow because the greatest obsticale you will ever face is you.”
So Let’s start to fight for your life
तुम्ही अजून कशाची वाट बघत आहात?
ह्मा पुस्तकाने मझ्यात खूप बदल आणला आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मी आता अभिमानाने म्हणू शकते की
“I am Unapologetically Myself Now”
धन्यवाद लिली ही पुस्तकरुपी भेट आम्हाला दिल्याबद्दल????????
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ