firang marathi audiobook review cover

फिरंग

पोस्ट शेयर करा:

लेखिका – गौरी पटवर्धन, मृण्मयी गोडबोले

प्रकार – ऑडिओ बुक

ऑडीओ कालावधी – १० तास

प्रकाशन – स्टोरीटेल

मुल्यांकन – ४.३ | ५

स्टोरीटेल वर ऐका

सद्यस्थितीत जर एखादा फिरंग आपल्या घरी आला आणि to be more specific चीनचा जर एखादा फिरंग आपल्या घरी आला तर आपण ‘ए हरामी वगैरे’ चालू करूत पण हो केवळ सदयस्थितीमुळे!

पण मीराचं आपल्यासारखं नाहीये. मीरा आधीपासूनच “हे जगातले सगळे फिरंग हरामी असतात” असा जप करायची. तिला त्यांचा वाईट असा काहीच अनुभव आलेला नव्हता तरीही तिचा हाच जप सतत चालू असायचा आणि योगायोग की काय पण आताशा तिच्या आयुष्यात एकच कुठलासा फिरंग सारखा सारखा येत होता आणि तिच्याशी कनेक्ट होऊ पाहत होता.

प्रचंड हुशार, मानी, स्वतःच्या तत्त्वावर चालणारी आणि तितकीच हट्टी, रागीट, हॅण्डल करायला अवघड पण लॉजिकल मीरा तिच्या आयुष्यात घडणारा हा योगायोग थांबवू शकत नव्हती किंबहुना तिच्याही नकळत ती त्या फिरंगला तिच्या आयुष्यात येऊ देत होती. त्यातच अबीरचं मीरा वरचं प्रेम… तिच्या प्रेमाबद्दलच्या जाणिवा… तिचं तिच्या आई वडीलांसोबतचं बोंडींग आणि ह्या सगळ्यांसोबतच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या व विस्मित करणाऱ्या प्रसंगांसोबत तिचा चालू असलेला एक रहस्यमय प्रवास म्हणजे हे पुस्तक!

फिरंगांचं तोंडही बघायला टाळणारी मीरा एखाद्या अनोळखी  फिरंगला शोधत एखद्या गावी कशी जाते? तो फिरंग तिच्या आयुष्यात कसा येतो? त्याचा आणि तिचा काय संबंध असेल? की त्याचा काहीतरी प्लॅन असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रंजकपणे जाणून घ्यायची असतील तर ‘storytel’ वरचं फिरंग हे पुस्तक नक्की ऐका. (वाचू ही शकता! E book स्वरूपात ही उपलब्ध). दोन व्यक्तींशिवाय हे पुस्तक इतकं इंटरेस्टिंग झालंच नसतं… एक म्हणजे अर्थातच लेखिका ‘गौरी पटवर्धन’; शेवट पर्यंत एनर्जी टिकवणारं आणि आजच्या वास्तववादी काळातही काल्पनिक कथा लॉजिकली पटवणारं  लिखाण त्यांनी केलं आहे आणि विशेष म्हणजे हे पुस्तक ऐकताना बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आता इथे पुस्तकाचा शेवट होईल की काय असे खूपदा वाटते पण लेखिकेने पारंपरिकतेला छेद देऊन खूप छान गोष्ट पुढे नेली आहे ह्याचं विशेष कौतुक! बरेच पुस्तकं शेवटी खूप प्रश्न निर्माण करून संपतात पण हे पुस्तक आपल्या सगळया प्रश्नांची उत्तरं देऊन संपतं आणि म्हणूनच प्रचंड शांत वाटतं. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे( प्ररसिध्द अभिनेेत्री) मृण्मयी गोडबोले ! ज्यांच्या आवाजात हें पुस्तक रेकॉर्ड झालं आहे… कमाssss ल पद्धतीने त्याांनी ही गोष्ट सांगितली आहे. वाचिक अभिनयाचं उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवलं आहे.

पुस्तकात बरेच क्यारेक्टर असून देखील ऐकताना आपला कुठेच गोंधळ होत नाही. प्रत्येक पात्राची बोलण्याची स्टाईल आणि आवाजातला बदल खूप सक्षमपणे त्यांनी हाताळला आहे. त्यांच्या गोड आणि मधुर आवाजामुळे आपण प्रत्येकी एक एक तासाचे असे दहा एपिसोड्स कसे ऐकून संपवतो हे आपल्याला ही कळत नाही.. थोडक्यात मृण्मयी गोडबोलेंमुळे ह्या ऑडियो बुकला चार चाँद लागले आहेत. तेव्हा ‘हे पुस्तक वाचण्यापेक्षा, ऐका!!’ असं मी आवर्जून म्हणेन.

gauri patwardhan mrinmayee godbole storytel audiobook pranjali kulkarni


स्टोरीटेल वर ऐका


पोस्ट शेयर करा:

About the author

प्रांजली कुलकर्णी

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *